Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याने सुनील गावस्कर यांच्या 49 वर्ष जुन्या रेकॉर्डची केली बरोबरी, वाचा सविस्तर
Steve Smith (Twitter)

ऑस्ट्रेलियाचा जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ (Steve Smith) याने एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आणि भारताचा महान सलामीवीर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांची बरोबरी केली. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस (Ashes) मालिकेत स्मिथने एकूण 774 धावा केल्या आणि 1970-71 मध्ये भारत विरुद्ध बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीमध्ये गावस्कर यांचा 769 धावांचा विक्रम मोडला. शिवाय, या मालिकेत स्मिथने गावस्करची बरोबरी देखील केली. गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 774 धावा केल्या होत्या.यात विशेष म्हणजे स्मिथ आणि गावस्कर यांनी चार कसोटी सामन्यांमध्ये 774 धावा केल्या आहेत. (Ashes 2019: डेविड वॉर्नर याला बाद करत स्टुअर्ट ब्रॉड याने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, जाणून घ्या)

यंदाच्या मालिकेत माजी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार, स्मिथने जबरदस्त फॉर्म दाखविला आणि पण, शेवटच्या कसोटीतील दुसर्‍या डावात केवळ 23 धावांवर बाद झाला. यापूर्वी त्याने 144, 142, 92, 211, 82 आणि 80 धावा केल्या आहेत. स्मिथ 7000 कसोटी धावा पूर्ण करण्यापासून 27 धावा दूर राहिला. आता त्याने 68 कसोटीत 6973 धावा केल्या आहेत. एका कसोटी मालिकेत स्मिथने सर्वाधिक धावा केल्याने आता तो संयुक्त रित्या 12 व्या स्थानावर पोहचला आहे. तर, अ‍ॅशेस मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथ पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 1930मध्ये डॉन ब्रॅडमन (Don Bradman) ने 974 धावा, हॅमंडने 1928-29 मध्ये 905 धावा, मार्क टेलरने 1989-90 मध्ये 839 आणि ब्रॅडमनने 1936-37 in मध्ये 810 धावा केल्या होत्या. शिवाय, स्मिथने टेस्टमध्ये स्वतःचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डदेखील मोडला. स्मिथने 2014-15 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान 769 धावा केल्या होत्या. आणि यंदाच्या इंग्लंडविरुद्ध मालिकेत स्मिथने चार मॅचमध्ये 774 धावा केल्या.

दुसरीकडे, यंदाच्या मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान दिले आहे. याचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ 148 धावांवर तंबुत परतला. यानंतर आलेल्या मॅथ्यू वेड आणि मिशेल मार्श यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मार्श 24 धावा करून बाद झाला. संध्या वेडने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि कर्णधार टिम पेन याच्यासाठी विजयासाठी संघर्ष करत आहे.