मुंबई: श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) विश्रांतीवर आहे. सप्टेंबरमध्ये संघ पुन्हा मैदानात उतरेल. बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची (IND vs BAN Test Series) आहे. पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. दुसरी कसोटी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. भारतीय संघ फेब्रुवारी 2024 नंतर प्रथमच लाल बॉल क्रिकेट खेळताना दिसणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघ प्रथमच कसोटी क्रिकेट खेळणार आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत अनेक कसोटी क्रिकेट सामने खेळले गेले. या सामन्यांमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.
1. आर अश्विन (R Ashwin)
भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने 2021 सालापासून कसोटीत अप्रतिम कामगिरी केली आहे. अश्विनने 2021 पासून 53 डावात 141 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने 9 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.
2. नॅथन लियॉन (Nathan Lyon)
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकी गोलंदाज नॅथन लायननेही गेल्या काही वर्षांत क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली आहे. लियोनने गेल्या तीन वर्षांत 55 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 136 विकेट घेतल्या आहेत. लियोनने 2021 पासून 6 वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
3. पॅट कमिन्स (Pat Cummins)
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने 2021 पासून आतापर्यंत 54 सामने खेळले आहेत. या काळात कमिन्सने वेगवान गोलंदाजी करताना 116 विकेट घेतल्या आहेत. कमिन्सने तीन वर्षांत 7 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series: काय सांगता! बांगलादेशविरुद्ध कसोटीत रोहित शर्माची वाईट कामगिरी, तीन सामने खेळूनही करू शकला नाही 50 धावा)
4. मिचेल स्टार्क (Mitchell Starc)
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कसोटी क्रिकेट आवडते. स्टार्कने गेल्या तीन वर्षांत 57 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये स्टार्कने 106 विकेट घेतल्या आहेत. स्टार्कला तीन वर्षांत एकदाच पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेता आल्या आहेत.
5. जेम्स अँडरसन (James Anderson)
नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन 2021 पासून 59 सामने खेळला आहे. यामध्ये अँडरसनने 104 विकेट घेतल्या आहेत. अँडरसनला तीनवेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्यात यश आले आहे.