Rohit Sharma (Photo Credit - X)

मुंबई: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा 110 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. या कारणामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने तिसरी वनडे गमावताच मालिकाही 2-0 अशी गमावली. भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) डावाच्या सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली. मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. दरम्यान, पहिल्या पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या 10 षटकांमध्ये संघासाठी आक्रमक फलंदाजीसाठी हिटमॅन ओळखला जातो. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला वनडे फॉरमॅटमध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक षटकार (Most Sixes in First 10 Overs of ODI) ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.

1. ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलने आपल्या कारकिर्दीत अनेक गोलंदाजांना षटकार ठोकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज आहे. 301 एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने पहिल्या 10 षटकांमध्ये 152 षटकार मारले आहेत.

2. रोहित शर्मा

या यादीत दुसऱ्या स्थानावर भारताचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 265 वनडे कारकिर्दीतील पहिल्या 10 षटकात 120 षटकार ठोकले आहेत.

3. मार्टिन गुप्टिल

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 198 वनडे सामन्यांमध्ये पहिल्या 10 षटकात 91 षटकार ठोकले आहेत. (हे देखील वाचा: Rohit Sharma ODI Sixes: षटकार मारण्यात 'हिटॅमन' रोहित शर्मा पोहचला ख्रिस गेलच्या बरोबरीत, आता शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडणार!)

4. ब्रेंडन मॅक्युलम

न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कारकिर्दीत 260 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्याने पहिल्या 10 षटकात 85 षटकार ठोकले.

5. पॉल स्टर्लिंग

आयर्लंडचा अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंगने आतापर्यंत 161 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने पहिल्या 10 षटकात 82 षटकार ठोकले आहेत.