Team India (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत (IND) आणि झिम्बाब्वे (ZIM) विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा (PAK) या स्पर्धेतील प्रवास जवळपास संपला आहे. पाकिस्तानी संघ आता भारतावर विसंबून उपांत्य फेरीची (Semi Final) आशा करू शकतो. पाकिस्तान संघासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम पाकिस्तान संघालाच नेदरलँड्ससमोर महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला इतर संघांच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागणार आहे. आजच्या सामन्यात आफ्रिकेविरुद्ध भारताच्या (IND vs SA) विजयासाठी पाकिस्तानी चाहते प्रार्थना करत आहेत. भारत आणि बांगलादेशच्या विजयानेच पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहू शकतो. पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी म्हणजे बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला आहे. आता पाकिस्तानचे लक्ष भारताच्या विजयावर असणार आहे.

पाकिस्तानला त्यांचे तीनही सामने जिंकणे आवश्यक 

सेमीफायनलच्या शर्यतीत पाकिस्तानचा संघ पूर्णपणे मागासलेला दिसतोय. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकले तर ते जास्तीत जास्त 6 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांचे सध्या प्रत्येकी तीन गुण आहेत, जर त्यांनी दोन सामने जिंकले तर त्यांची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता सात गुणांसह वाढेल. (हे देखील वाचा: IND vs SA T20 WC 2022 Live Streaming Online: स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी उतरणार भारत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)

प्रत्येक सामन्यात पाकिस्तानी भारताच्या विजयासाठी करतील प्रार्थना 

टीम इंडियाने आपल्या उत्कृष्ट फॉर्मसह ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. आता उर्वरित सर्व सामन्यांमध्ये टीम इंडिया विजयी व्हावी यासाठी पाकिस्तानी चाहते प्रार्थना करतील. टीम इंडिया एका मॅचमध्ये हरली तर पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल. आज जर दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर पाकिस्तान आणि आफ्रिका यांच्यातील सामना हा ग्रुप 2 मधील महत्त्वाचा सामना असेल. त्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो टीम इंडियासोबत ग्रुप-2 मधून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.