T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत (IND vs SA) आहे. या स्पर्धेतील हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात कठीण सामना असू शकतो. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचे मोठे आव्हान असेल. या स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारताचे चार गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत अव्वल आहे आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेविरुद्ध पाच सामने खेळले असून चार जिंकले आहेत. या स्पर्धेत भारताचा शेवटचा पराभव 2009 मध्ये झाला होता. अशा स्थितीत टीम इंडियाला विजयाचा विक्रम कायम राखायचा आहे. तसेच जाणून घेऊया सामन्याचे Live Streaming कुठे पाहणार तुम्ही...
भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना कधी आणि कुठे आहे?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 30 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी आहे. आणि हा सामना पर्थ क्रिकेट मैदानावर होणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कधी सुरू होईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता आहे. नाणेफेक संध्याकाळी 4 वाजता होईल. (हे देखील वाचा: IND vs SA Weather Update: पावसामुळे टीम इंडियाचा खेळ होवू शकतो खराब? जाणून घ्या पर्थमध्ये कसे असेल हवामान)
सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहणार?
भारतातील डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
सामना विनामूल्य कसा पाहणार?
हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.