KAR vs VID Vijay Hazare Trophy Final: विजय हजारे ट्रॉफी आज म्हणजेच शनिवारी विजेता होणार आहे. स्पर्धेतील विजेतेपदाच्या सामन्यात कर्नाटकचा सामना विदर्भाशी होईल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यापूर्वी, कर्नाटकने उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या हरियाणाला हरवून जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. त्याच वेळी, विदर्भ संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मयंक अग्रवालच्या टीम कर्नाटक आणि करुण नायरच्या टीम विदर्भाचे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. त्याच वेळी, जर आपण दोन्ही संघांमधील शेवटच्या तीन सामन्यांवर नजर टाकली तर कर्नाटकने सर्व सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना 11 डिसेंबर 2023 रोजी खेळला गेला होता.
The showdown is here! 🌟
🏆 Vijay Hazare Trophy 2024-25 Final 🏆
Karnataka 🆚 Vidarbha
📅 18th January
🕐 1:30 PM IST
📍 Vadodara
Who will emerge victorious? 🤔#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RDr6oiTY3w
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 17, 2025
किती वाजता सुरु होणार सामना?
विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना शनिवार, 18 जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर होणार आहे. तसेच सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. (हे देखील वाचा: Mohammed Shami Post: मोहम्मद शमीने टीम इंडियामध्ये पुनरागमनाची केली तयारी, व्हिडिओ शेअर करून दाखवला उत्साह)
कुठे पाहणार लाइव्ह सामना?
कर्नाटक विरुद्ध विदर्भ अंतिम सामना भारतीय चाहते स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहू शकतात. तसेच या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओसिनेमा अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघाचे खेळाडू
विदर्भ संघ : ध्रुव शौरे, यश राठोड, करुण नायर (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, पार्थ रेखाडे, यश ठाकूर, दर्शन नळकांडे, अक्षय वाडकर, आदित्य ठाकरे, अथर्व ठाकरे, अमन मोखाडे यश कदम , प्रफुल हिंगे
कर्नाटक संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनीश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), श्रेयस गोपाल, अभिनव मनोहर, हार्दिक राज, प्रसीद कृष्णा, वासुकी कौशिक, अभिलाष शेट्टी, किशन बेदारे, विद्याधर सियावदिया पाटील. , मनोज भंडागे, निकिन जोस, विजयकुमार विशक, प्रवीण दुबे