Team India (Photo Credit - Twitter)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) पुढील मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया 25 जानेवारीपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडशी (IND vs ENG) भिडणार आहे. याआधी टीम इंडिया आजपासून हैदराबादमध्ये या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी सराव सुरू करणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका जानेवारीपासून सुरू होऊन मार्चपर्यंत चालणार आहे. या मालिकेतील सर्व सामने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवले जातील, त्यामुळे हे सामने अधिक महत्त्वाचे आहेत. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2024: भारत-इंग्लंड कसोटीत कोणत्या गोलंदाजानी घेतल्या सर्वाधिक विकेट्स? ही आहे टॉप पाच गोलंदाजांची यादी)

 

तिकीट कसे आणि कुठे बुक करणार?

चाहते पेटीएम इनसाइडर अॅपला भेट देऊन पहिल्या कसोटी सामन्याची तिकिटे बुक करू शकतात. 18 जानेवारीपासून तुम्ही www.insider.in वर जाऊन ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.

तुम्ही याप्रमाणे ऑफलाइन तिकिटे मिळवू शकता

जर चाहते ऑनलाइन तिकिटे बुक करू शकत नसतील तर ते ऑफलाइन देखील तिकिटे खरेदी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखपत्रासह जिमखाना मैदानावर जावे लागेल. ऑफलाइन तिकिटांसाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, कारण त्याची तिकिटे 22 जानेवारीपासून उपलब्ध होतील.

तिकीट दर:

नॉर्थ पॅव्हेलियन तिकिटाची किंमत (टेरेस) - रु 200-600

दक्षिण पॅव्हेलियन तिकीट (टेरेस) – 200-600 रुपये

दक्षिण पॅव्हेलियन तिकीट (तळमजला) - रु. 1250-3750

दक्षिण पॅव्हेलियन (पहिला मजला) - रु. 1250- रु. 3750

नॉर्थ पॅव्हेलियन कॉर्पोरेट बॉक्स तिकीट - रु. 3,000 ते रु. 12,000

साउथ पॅव्हेलियन कॉर्पोरेट बॉक्स तिकीट - रु 4,000 ते रु. 16,000

यांना मिळणार मोफत प्रवेश

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये 25 ते 29 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. 26 जानेवारी रोजी सशस्त्र दलाचे जवान विनामूल्य सामन्याचा आनंद घेऊ शकतील. एका दिवसात 5 हजार शालेय मुलेही या स्पर्धेचा मोफत आनंद घेऊ शकतात. शाळकरी मुलांना फक्त त्यांचा ड्रेस आणि ओळखपत्र घेऊन स्टेडियममध्ये यावे लागेल.