Happy Birthday Virat Kohli: विराट कोहली याच्या वाढदिवशी युवराज सिंह याने शेअर केले 'हे' फोटो, पाहून तुमचेही होतील अश्रू अनावर
युवराज सिंह, विराट कोहली (Photo Credit: Instagram)

सध्या विश्व क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेला भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आजच्या युगात रेकॉर्डची नवी गाथा लिहिणारा कोहली केवळ भारतातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही सर्वात धोकादायक फलंदाज बनला आहे. कोहलीचा मस्तमौला स्वभाव सर्वांना माहित आहे आणि तो सध्या पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह आपला वाढदिवस भूतानमध्ये साजरा करीत आहे. विराट, सध्या देशात  त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. वाढदिवसानिमित्त विराटचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले आणि त्याला आजच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह (Yuvraj Singh) याचाही समावेश आहे. (Happy Birthday Virat Kohli: ICC-BCCI सह दिग्गज क्रिकेटपटूंनी 'रनमशीन' ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा)

ट्विटरवरून विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत युवराज जुन्या आठवणींमध्ये रमला. युवराजने कोहली आणि त्याचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आणि शुभेच्छा दिल्या. “ते पण काय दिवस होते! आणि आजचा हा एक दिवस आहे! असो जिथे असशील खुश रहा, परमेश्वराचा आशिर्वाद तुला मिळो. वाढदिवसाच्या शुभेच्छा विराट कोहली,” युवराजने ट्विटवर लिहिले. युवराजव्यतिरिक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही कोहलीचे अभिनंदन केले आणि लिहिले 'वाढदिवसाच्या शुभेच्छा विराट! अश्याच उत्साहाने धावा करत रहा आणि भारताचे नेतृत्व करत रहा."

सचिन

दरम्यान, कोहलीने सकाळी भूतानमधील एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो अनुष्कासोबत निसर्गरम्य ठिकाणी बसलेला दिसत आहे. या फोटोद्वारे विराटने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल फोटोद्वारे आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. कोहली बांग्लादेशविरुद्ध कसोटी सामन्यांसाठी क्रिकेट मैदानावर परतेल. दोन्ही संघातील टेस्ट मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.