विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. 5 नोव्हेंबर 1988 ला जन्मलेल्या कोहलीचा जगातील महान फलंदाजांच्या यादीत समावेश केला जातो. सर्वात जलद 10,000 वनडे धावा करणाऱ्या विराटने 11 वर्षाच्या कारकिर्दीत जे उच्च स्थान मिळवले आहे त्याची पुनरावृत्ती करणे भविष्यात कोणत्याही क्रिकेटपटूला कठीण जाणार आहे. आज सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक करत अभिनंदनाचे ट्विट केले आहे. भारतीय क्रिकेट मंडळ, (BCCI) ने कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने विराट 'रनमशीन' बनण्याची सुरुवात कशी झाली ते सांगितले आहे. हा व्हिडिओ विराटच्या पहिल्या वनडे शतकाचा आहे. विराटने 24 डिसेंबर 2009 मध्ये श्रीलंका (Sri Lanka) विरूद्ध सामन्यात पहिले वनडे शतक झळकावले होते. कोहलीने 18 ऑगस्ट 2008 यामध्ये श्रीलंकाविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (Happy Birthday Virat Kohli: 31 व्या वाढदिवसानिमित्त विराट कोहली याने लिहिली Life Lesson देणारी 'ही' खास पोस्ट, पाहा Tweet)

विराटच्या पहिल्या वनडे शतकाचा व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, "टीम इंडियाचा कर्णधार 31 वर्षांचा झाला आहे, चला तर आपण पहिले वनडे शतक पाहूया, जिथे रनमशीनसाठी  सुरुवात झाली." 2009 मध्ये कोहलीने पहिले वनडे शतक केले आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज कोहलीने 43 वनडे शतक ठोकले आहे आणि सर्वाधिक वनडे शतकांच्या यादीत तो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल (IPL) मधील कोहलीचा सहकारी खेळाडू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांनीही ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले आहे. विराटने ट्विटरवर जुना फोटो शेअर करुन कैफने आपले जुन्या दिवसांची आठवण काढली आहे. याच्याशिवाय वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह अन्य दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटलाशुभेच्छा दिल्या.

जय शाह, बीसीसीआय सचिव

मोहम्मद कैफ

हरभजन सिंह

राजीव शुक्ला, आयपीएल अध्यक्ष

व्हीव्हीस लक्ष्मण

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

वीरेंद्र सेहवाग

आयसीसी

यावेळी विराट पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) समवेत भूतानमध्ये आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. विराट आणि अनुष्का भूतान व्हेकेशनवर आहेत. कोहली आणि अनुष्का या ट्रिपचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आपल्या नवीन अनुभवाबद्दलही सांगत आहे.