Rohit Sharma Stats Againts CSK: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहित शर्माची अशी आहे कामगिरी, पाहा 'हिटमॅन'ची आकडेवारी
Rohit Sharma (Photo Credit - Twiter)

MI vs CSK: इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 17 व्या (IPL 2024) हंगामात रविवारी दोन सामने खेळवले जाणार आहेत. दिवसाच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी गेला. तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (MI vs CSK) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. (हे देखील वाचा: MI vs CSK, IPL 2024 29th Match: रविवारी दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने, आकडेवारीत कोण आहे वरचढ घ्या जाणून)

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहित शर्माची कामगिरी 

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहित शर्माची कामगिरी आयपीएलच्या इतिहासात उत्कृष्ट ठरली आहे. रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आतापर्यंत 33 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 33 डावात 26.37 च्या सरासरीने आणि 125.56 च्या स्ट्राईक रेटने 791 धावा केल्या आहेत. या काळात रोहित शर्माने 7 अर्धशतकेही झळकावली आहेत. रोहित शर्माची चेन्नई सुपर किंग्जविरुद्धची 87 धावांची सर्वोत्तम कामगिरी आहे. रोहित शर्माही तीन वेळा नाबाद राहिला आहे. त्याचप्रमाणे रोहित शर्मानेही चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना 18 झेल घेतले आहेत.

सीएसकेच्या प्रमुख गोलंदाजांविरुद्ध रोहित शर्माची कामगिरी

रोहित शर्माने आयपीएलच्या 10 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरचा सामना केला आहे. या काळात रोहित शर्मा तीनदा दीपक चहरचा बळी ठरला आहे. दीपक चहरविरुद्ध 49 चेंडूत 60 धावा करण्यात रोहित शर्माला यश आले आहे. दीपक चहर व्यतिरिक्त, रोहित शर्माने मुस्तफिजुर रहमानविरुद्ध 4 डावात 19 चेंडूत 22 धावा केल्या आहेत आणि एकदा तो बाद झाला आहे. रवींद्र जडेजाविरुद्ध रोहित शर्माने 16 डावात 72 चेंडूत 71 धावा केल्या असून 3 वेळा तो बाद झाला आहे.

रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीवर एक नजर

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने 2008 साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. रोहित शर्माने आतापर्यंत 248 सामन्यांच्या 243 डावांमध्ये 29.61 च्या सरासरीने आणि 130.77 च्या स्ट्राईक रेटने 6,367 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माची सर्वोत्तम धावसंख्या 109 धावा आहे. 158 सामन्यात कर्णधार असताना रोहित शर्माने 87 सामने जिंकले आहेत, तर 67 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ४ सामने बरोबरीत आहेत.