
DC vs KKR TATA IPL 2025 48th Match: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा 48 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे. (हे देखील वाचा: DC vs KKR Head to Head: दिल्ली आणि कोलकातामध्ये कोणाचा वरचष्मा, येथे पाहा हेड टू हेड रेकॉर्ड)
हेड टू हेड रेकाॅर्डमध्ये कोण आहे वरचढ?
आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण 34 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये केकेआरने वरचढ कामगिरी केली आहे. केकेआरने 34 पैकी 18 सामने जिंकले आहेत, तर दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. गेल्या 5 सामन्यांमध्ये दिल्लीने 3 तर केकेआरने 2 सामन्यात विजय मिळवला आहे. या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत.
केएल राहुलवर उत्तम फॉर्ममध्ये
डीसी विरुद्ध केकेआर सामन्यात, सर्वांच्या नजरा केएल राहुलवर असतील जो उत्तम फॉर्ममध्ये आहे. या हंगामात केएल दिल्लीचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला आहे. त्याने 8 सामन्यांमध्ये सुमारे 60 च्या सरासरीने आणि सुमारे 146च्या स्ट्राईक रेटने 364 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतके झाली आहेत. गोलंदाजीतही मिचेल स्टार्ककडून खूप अपेक्षा असतील. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलही गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे. त्याने गेल्या सामन्यात दोन विकेट घेतल्या. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ मिळाली नाही.
कोलकातासाठी, संपूर्ण संघ चिंतेचा विषय
कोलकातासाठी, संपूर्ण संघ चिंतेचा विषय आहे. टॉप ऑर्डरला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही. मधल्या फळीत रिंकू सिंग, वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल यांनाही त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीतही संघाला संघर्ष करावा लागत आहे.
दिल्ली विरुद्ध कोलकाता ड्रीम 11 अंदाज (DC vs KKR Dream11 Prediction)
यष्टीरक्षक: केएल राहुल (उपकर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज, अभिषेक पोरेल.
फलंदाज: ट्रिस्टन स्टब्स, अंगकृष्ण रघुवंशी, अजिंक्य रहाणे
अष्टपैलू खेळाडू: सुनील, नरेन, अक्षर पटेल (कर्णधार)
गोलंदाज: कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, फाफ डू प्लेसिस, करुण नायर, विपराज निगम, अक्षर पटेल (कर्णधार), केएल यादव, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, मिचेल स्टार्क.
कोलकाता नाईट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोवमन पॉवेल, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.