न्यूझीलंडचा (New Zealand) सलामीवीर मार्टिन गुप्टिलने (Martin Guptill) रोहित शर्माचा (Rohit Sharma) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विश्वविक्रम मोडला आहे. मार्टिन गुप्टिलने रोहित शर्मासारख्या धोकादायक फलंदाजाला मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा धक्का दिला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकत मार्टिन गुप्टिल हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. 35 वर्षीय गुप्टिलने 31 चेंडूत 40 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने रोहित शर्माला मागे टाकत नवीन विक्रम केला.
गप्टिलचा सलामीचा जोडीदार फिन ऍलननेही आपले पहिले टी-20 शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना त्याने 56 चेंडूत 101 धावा केल्या आणि न्यूझीलंडने पाच विकेट्सवर 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा संघ आठ विकेट्सवर केवळ 157 धावाच करू शकला. न्यूझीलंडकडून ईश सोधीने 28 धावांत चार आणि मायकेल सँटनरने 23 धावांत दोन गडी बाद केले. (हे देखील वाचा: IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत केले क्लीन स्वीप, कोच राहुल द्रविडने केले टीमचे कौतुक (Watch Video)
Tweet
Martin Guptill becomes the new #1 run scorer in men's T20Is 🙌
More ➡️ https://t.co/2Jv44VXPe5#IREvNZ pic.twitter.com/wmsPcSO8jg
— ICC (@ICC) July 28, 2022
गुप्टिलने त्याच्या खेळीदरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3399 धावा केल्या आणि रोहित शर्माच्या 3389 धावांना मागे टाकले. त्यापाठोपाठ भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (3308 धावा), आयर्लंडचा वनडे कर्णधार पॉल स्टर्लिंग (2894 धावा) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (2855 धावा) यांचा क्रमांक लागतो. कोहली 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.