COVID-19 Outbreak: कोरोना व्हायरसवर न्यूझीलंडच्या मिशेल मैक्लेनाघन ने केले खोडकर ट्विट, Condom शी तुलना करत दिला सावध राहण्याचा सल्ला
मिशेल मैक्लेनाघन (Photo Credit: Getty)

न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज मिशेल मैक्लेनाघन (Mitchell McClenaghan) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधीही विनोदाची कमी करत नाही. तो ट्विटर आणि इंस्टाग्रामसारख्या ठिकाणी खूपच सक्रिय आहे आणि आपल्या चाहत्यांसह मनोरंजक संभाषण साधने त्याला पसंत आहे. मैक्लेनाघनने कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) धोक्याबद्दल लोकांना समजावण्यासाठी कंडोम हा शब्द अतिशय हास्यास्पदपणे वापरला आहे. गेल्या एक आठवडाभरात प्राणघातक कोरोना व्हायरस सर्व विश्वभर पसरला असून जगभरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या व्हायरसचा संक्रमण होणाऱ्या लोकांची संख्या आणि सोबत मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. चीन, इटली आणि इराणसारख्या देशांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. इंग्लंडमध्येही 2,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि कोविड-19 (COVID-19) ने भारतातही थैमान घातले आहे. आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या संख्येने जमाव टाळण्याचे, घरी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (COVID-19 चा धोका लक्षात घेत मायदेशी परतलेला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकी संघ सेल्फ-आयसोलेशनमध्ये)

मैक्लेनाघनने देखील विषाणूविषयी जागरूकता पसरविली, परंतु विनोदी पद्धतीने. त्याने घरांची कंडोम आणि कोविड-19 ची लैंगिक संक्रमित आजारांशी (एसटीडी) तुलना केली. त्याने ट्विटरवर लिहिले की, “तुमचे घर कंडोम आहे आणि कोविड-19 हा एक असाध्य रोग आहे, असे समजू. जे फक्त घरी राहूनच टाळता येते. नुकसान पोहोचण्यापूर्वी आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे." वेगवान गोलंदाजाने प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित राहण्याचे महत्त्व सांगितले.

पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) 2020 च्या आवृत्तीत मैक्लेनाघन अलीकडेच कराची किंग्जकडून इमाद वसीमच्या नेतृत्वात खेळला. कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर त्याने स्पर्धा मध्यभागी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मायदेशी परतला. अखेर उपांत्य फेरीच्या दिवशी पीएसएल रद्द करण्यात आला. यापूर्वी, कराची किंग्जने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले होते.