SA vs PAK (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd Test 2025: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान (SA vs PAK) यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील (Capetown) न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पाचव्या दिवशी 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. आता दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील. दुसरीकडे पाकिस्तान संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघ कसोटीत 29 वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेने 29 पैकी 16 कसोटी सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ 6 सामने जिंकले आहेत. (हे देखील वाचा: SA vs PAK 2nd Test 2025 Capetown Stats: न्यूलँड्समध्ये खेळवला जाणार दक्षिण आफ्रिका- पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना, जाणून घ्या मैदानावरील घातक आकडेवारी)

सॅम आयुब विरुद्ध कागिसो रबाडा

पाकिस्तानचा युवा फलंदाज सॅम अयुब आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यातील संघर्ष हे या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरू शकते. सॅम अयुब त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, तर रबाडा आपल्या वेगवान आणि अचूकतेने कोणत्याही फलंदाजाला अडचणीत आणू शकतो. रबाडाच्या घातक गोलंदाजीचा सॅम कसा सामना करतो हे पाहणे रंजक ठरेल.

मोहम्मद अब्बास विरुद्ध एडन मार्कराम

पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम यांच्यातील लढतही रोमांचक होऊ शकते. अब्बास त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याच्या चेंडूंचा सामना करणे मार्करामसाठी सोपे नसेल. हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरू शकतो.

दोन्ही संघांची संतुलित लाईनअप

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम मिलाफ आहे. दक्षिण आफ्रिकेकडे एडन मार्कराम, टेंबा बावुमा आणि कागिसो रबाडासारखे अनुभवी खेळाडू आहेत, तर पाकिस्तानकडे बाबर आझम, सौद शकील आणि मोहम्मद रिझवानसारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.