Team India Tour New Zealnd: टीम इंडियाचे हे 7 खेळाडू T20 विश्वचषक नंतर मायदेशी परतणार, बाकीचे जाणार न्यूझीलंडला
Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया (Team India) उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत होऊन टी-20 विश्वचषक (T20 WC 2022) स्पर्धेतून बाहेर पडली आहे. साखळी टप्प्यात सर्वाधिक 4 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत विजय मिळवता आला नाही. भारताच्या 6 गोलंदाजांना इंग्लंडच्या एका फलंदाजालाही बाद करता आले नाही. दरम्यान, भारतीय संघाचे 7 खेळाडू ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतणार आहेत, तर उर्वरित न्यूझीलंडला (New Zealand) जाणार आहेत. वास्तविक, T20 विश्वचषक 2022 नंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार होती, ज्यासाठी संघाची घोषणा आधीच झाली आहे.

हे खेळाडू परतणार मायदेशी

T20 विश्वचषक गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, फिरकीपटू आर अश्विन, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मायदेशी परतणार आहेत. यापैकी दिनेश कार्तिक आणि आर अश्विन यांची आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड होणार नाही. इतकंच नाही तर टीम इंडियाचा संपूर्ण कोचिंग स्टाफही बदलला जाणार आहे, कारण त्यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण अँड कंपनी न्यूझीलंडला जाणार आहे.

3 सामन्यांची T20I मालिका

टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 3 सामन्यांची T20I मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळवला जाईल, तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 25 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होईल. (हे देखील वाचा: INDvsENG: 'नाण्याला दोन बाजू असतात...'; भारताच्या पराभवानंतर Sachin Tendulkar ने दिली प्रतिक्रिया (See Tweet)

न्यूझीलंड T20I मालिकेसाठी भारतीय संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.