IND vs PAK: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) काही काळापूर्वी भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup 2023) अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. आता 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मेगा इव्हेंटच्या कार्यक्रमात काही बदल झाल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठे विधान केले आहे की, 2-3 क्रिकेट मंडळांनी वेळापत्रकात बदल करण्याबाबत सांगितले आहे आणि ते लवकरच जाहीर केले जाईल. भारतीय संघाला आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या मैदानावर खेळायचा आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या (IND vs PAK) सामन्याच्या तारखेत बदल झाल्याची बातमी समोर येत आहे.
The 2023 ODI World Cup schedule will undergo a few changes
This comes after it emerged this week that the BCCI was looking at moving the India vs Pakistan fixture: https://t.co/fwhwMiq4gI pic.twitter.com/ErALfQ1yYE
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 28, 2023
जय शाह यांनी दिली माहिती
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी वेळापत्रकातील बदलाबाबत एएनआयला दिलेल्या निवेदनानुसार, जर भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली तर एकापेक्षा जास्त सामन्यांच्या तारखेत बदल होऊ शकतो. 15 ऑक्टोबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान सामना हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे, अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांनी या सामन्याच्या तारखेत बदल करण्याचे सांगितले आहे. त्यावर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. (हे देखील वाचा: India Beat West Indies: भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी)
फक्त तारीख बदलेल, स्थळ नाही
बीसीसीआयच्या वतीने जय शाह यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की जर भारत-पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक बदलले तरच त्याची तारीख बदलली जाईल, स्थळ नाही. वृत्तानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत आयसीसीकडून नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल.