India Beat West Indies: भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी
पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs WI 1st ODI 2023: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज बार्बाडोस येथे खेळला गेला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 23 षटकांत केवळ 114 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 22.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक 52 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी म्हणजेच 29 जुलै रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाणार आहे.
1ST ODI. India Won by 5 Wicket(s) https://t.co/OoIwxCvNlQ #WIvIND
— BCCI (@BCCI) July 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2023 08:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

