PAK vs ZIM (Photo Credit - X)

Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 3rd T20I 2024 Live Streaming: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज, गुरुवार, 5 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संघ 12.4 षटकांत 57 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाने 5.3 षटकांत लक्ष्य गाठले. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्लीन स्वीप टाळण्याकडे झिम्बाब्वेच्या नजरा असतील. तर पाकिस्तान संघ तिसरा सामना जिंकून मालिकेत स्वीप करू इच्छितो. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा टी-20 सामना कधी होणार?

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 आज, गुरुवार, 5 डिसेंबर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:00 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. तर नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे. (हे देखील वाचा: Pakistan Squad Announced for South Africa Tour: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी)

कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?

आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून तिसऱ्या टी-20चा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

झिम्बाब्वे: तादिवनाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डिऑन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, क्लाइव्ह मदांडे, त्शिंगा मुसेकिवा, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू.

पाकिस्तान: सईम अयुब, ओमेर युसूफ, उस्मान खान (विकेटकीपर), सलमान आगा (कर्णधार), तय्यब ताहिर, इरफान खान, जहंदाद खान, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, हरिस रौफ, सुफियान मुकीम.