पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo: @T20WorldCup)

Pakistan tour of South Africa: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सर्व मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्फोटक फलंदाज फखर जमानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत संधी मिळाली नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही फखर जमान संघाचा भाग नव्हता. बाबर आझमच्या समर्थनार्थ ट्विट केल्याबद्दल बोर्डाने फखरवर कारवाई केल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ - मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, जहानद खान, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, सॅम अयुब, सलमान , शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ - मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सॅम अयुब, सलमान आगा , शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ - शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मीर हझमा, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक). यष्टिरक्षक), नसीम शाह, नोमान अली, सॅम अयुब आणि सलमान अली आगा.

हे देखील वाचा: Blind T20 World Cup: पाकिस्तानने फायनलमध्ये बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव करत T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले

पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक

10 डिसेंबर- पहिली टी-20 सामना

13 डिसेंबर- दुसरा टी-20 सामना

14 डिसेंबर- तिसरा टी-20 सामना

17 डिसेंबर- पहिली वनडे सामना

19 डिसेंबर - दुसरा वनडे सामना

22 डिसेंबर- तिसरा वनडे सामना

26 ते 30 डिसेंबर - पहिली कसोटी सामना

3 ते 7 जानेवारी - दुसरा कसोटी सामना