टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 टप्प्यातील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला शेजारी न्यूझीलंडचा (AUS vs NZ) सामना करावा लागणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) होणार्या या सामन्यासह दोन्ही संघांना टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघांना त्यांच्या मागील मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या टी-20 तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत किवी संघाचा पराभव झाला. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत यजमानांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आज या दोन संघामध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. तसेच या सामन्याचे Live Streaming कुठे पाहणार? जाणून घ्या...
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?
शनिवारी (22 ऑक्टोबर) दोन्ही संघांमधील हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर रंगणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
भारतीय वेळेनुसार या सामन्याचा नाणेफेक 12:00 वाजता होईल आणि सामन्याचा पहिला चेंडू 12:30 वाजता टाकला जाईल.
सामना कोणत्या चॅनलवर पाहता येईल?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्याचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. अशा परिस्थितीत स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर हा सामना पाहता येईल. (हे देखील वाचा: IND vs PAK: भारताविरुद्धच्या 'युद्ध'पूर्वी पाकिस्तानसाठी वाईट बातमी; स्टार फलंदाजाच्या डोक्याला दुखापत)
या सामन्याचे Live Streaming कुठे पाहू शकतो?
सामन्याचे ऑनलाइन Live Streaming Disney+ Hotstar वर पाहता येईल.