Shubman Gill (Photo Credit - Twitter)

IND vs AUS World Cup 2023: 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) च्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर आयोजित सराव सत्रातही तो सहभागी झाला नाही. शुभमन गिल संघाचा अनुभवी फलंदाज असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना खेळला नाही तर संघासाठी मोठी अडचण होऊ शकते. वास्तविक, गिलने रोहित शर्मासोबत सलामी दिली आणि तो बराच काळ या स्थितीत खेळत आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी डावाची सुरुवात कोण करणार याबाबत साशंकता आहे.

गिलच्या जागी कोण येणार सलामीला?

गिलच्या जागी ईशान किशन आणि केएल राहुलचे नाव पुढे येत आहे. किशनने याआधी अनेक वेळा भारतासाठी डावाची सलामी दिली आहे. सलामीवीर म्हणून त्याने द्विशतकही झळकावले आहे. अशा परिस्थितीत संघ त्याला रोहितसह डावाची सुरुवात करायला लावू शकतो. किशन बराच काळ चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळत असला तरी संघ त्याच्या पदाशी छेडछाड करण्याचा धोका पत्करेल की नाही हे व्यवस्थापनावर अवलंबून असेल.

कशी आहे केएल राहुलची कामगिरी

केएल राहुलच्या कामगिरीवर बोलायचे झाले तर केएल राहुल  भारताकडून 16 एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून खेळला आहे. या कालावधीत त्याने 669 धावा केल्या आहेत. तसेच  या दरमयान करताना राहुलने दोन शतके आणि पाच अर्धशतकेही झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतानात्याने सात एकदिवसीय सामने खेळले आहेत.या सात सामन्यात त्याने  246 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: India Beat Bangladesh: टीम इंडियाने बांगलादेशचा 9 गडी राखून केला पराभव, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत घेतली धमाकेदार एन्ट्री)

विराट कोहलीही आहे दावेदार

इशान किशनच्या स्थानात बदल न करण्याचा निर्णय घेतल्यास संघ अनुभवी फलंदाज विराट कोहलीवर ओपनिंगची जबाबदारीही सोपवू शकतो. कोहली बराच काळ तिसर्‍या क्रमांकावर खेळत आहे, जरी त्याचा सलामीचा विक्रम तितकासा वाईट नाही.