Asian Gamesh 2023: भारतीय क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत आशियाई क्रीडा 2023 च्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा (India Beat Bangladesh) पराभव केला. यासह भारत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने सुरुवातीपासूनच बांगलादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणले आणि त्यांना केवळ 96 धावाच करू दिल्या. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुरुवातीलाच यशस्वी जैस्वालची विकेट गमावली, मात्र नंतर ऋतुराज गायकवाड आणि टिळक वर्मा यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. या सामन्यात टिळक वर्माने अर्धशतक ठोकुन अनेक उत्कृष्ट शॉट्स खेळून सर्वांची मने जिंकली.
TEAM INDIA ARE INTO THE FINALS OF ASIAN GAMES....!!! 🇮🇳 pic.twitter.com/voXqEmzeut
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)