Team India (Photo Credit - Twitter)

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 संपल्यानंतर आजपासुन म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेकडे टीम इंडियाच्या 2024 टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. पुढील आयसीसी स्पर्धा 6 महिन्यांनंतर म्हणजेच जूनमध्ये खेळवली जाईल. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. हा टी-20 विश्वचषक खूप खास असणार आहे. यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघ खेळताना दिसणार आहेत. टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेने या स्पर्धेची तयारी सुरू करणार आहे. त्याच वेळी, टीम इंडियाला या स्पर्धेसाठी आपला सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी खूप कमी सामने मिळतील.

टी-20 विश्वचषकापूर्वी अनेक सामने

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. जी उद्यापासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 टी-20 सामने खेळणार आहे. 2024 च्या सुरुवातीला टीम इंडियाला अफगाणिस्तानविरुद्ध 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाला केवळ 11 टी-20 सामने खेळायला मिळणार आहेत. (हे देखील वाचा: Team India New Coach: व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक होण्याची शक्यता - अहवाल)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका

पहिला टी-20 - 23 नोव्हेंबर, विशाखापट्टणम

दुसरा टी-20 - 26 नोव्हेंबर, तिरुवनंतपुरम

तिसरा टी-20 - 28 नोव्हेंबर, गुवाहाटी

चौथा टी-20 - 1 डिसेंबर, नागपूर

पाचवा टी-20 - 3 डिसेंबर, हैदराबाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका

पहिला टी-20 - 10 डिसेंबर, डर्बन

दुसरा टी-20 - 12 डिसेंबर, केबेरा

तिसरा टी-20 - 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग

अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका

पहिला टी-20 - 11 जानेवारी 2024, मोहाली

दुसरा टी-20 - 14 जानेवारी 2024, इंदूर

तिसरा टी-20 - 17 जानेवारी 2024, बेंगळुरू

टी-20 विश्वचषक 16 वर्षांपासून जिंकलेला नाही

टीम इंडियाने गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी काबीज केलेली नाही. त्याचबरोबर टीम इंडियाने शेवटचा टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये जिंकला होता. या स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती होती, ज्यामध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धा जिंकली.