
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) 12 वा सामना आज 2 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहे. तसेच उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रलियासोबत होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संघ 45.3 षटकात गारद झाला.
The 2025 Champions Trophy semi-finals are set 🍿 pic.twitter.com/Vj949ONnMv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 2, 2025
'या' दिवशी रंगणार रोमांचक सामना
भारतीय संघाने अ गटात 3 सामने खेळले आणि सर्व सामने जिंकले आणि अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर राहिला. न्यूझीलंडने 2 सामने जिंकले आणि 1 सामना गमावला. ग्रुप अ मधून न्यूझीलंडचा प्रवास दुसऱ्या स्थानावर संपला. तथापि, आता भारताचा सामना 4 मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2.30 खेळला जाईल. तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड 5 मार्च रोजी लाहोरमध्ये दुपारी 2.30 वाजता आमनेसामने येणार आहेत.
हे देखील वाचा: Glenn Phillips Catch Video: ग्लेन फिलिप्सने हवेत घेतला अद्भुत झेल, कोहली पाहतच राहिला; पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियाही उत्तम फॉर्ममध्ये
ऑस्ट्रेलियाही उत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला हरवले होते. कांगारू संघाने इंग्लंडविरुद्ध 352 धावांचे लक्ष्य गाठले होते. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीचा सामना भारतासाठी कठीण काम असणार आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. अशा परिस्थितीत भारतीय संघालाही बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.