
ऑस्ट्रेलियाचा (Australia) आगामी दौरा वाचवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) दोन आठवड्यांच्या क्वारंटाइनसाठी (Quarantine) मान्यता दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे सद्यस्थिती लक्षात घेता भारतीय संघाचा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर संकट आहे. सध्या कोरोनामुळे सर्व क्रिकेट मालिका रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत बीसीसीआयचा खजिनदार अरुण धूमल (Arun Dhumal) यांनी दौर्यावर चांगला प्रतिसाद दिला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने इंटरव्यूमध्ये धूमलने दोन आठवड्यांच्या क्वारंटाइनवर म्हटले की, "त्याशिवाय काही उपाय नाही, प्रत्येकाने तेच केले पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे की क्रिकेट लवकरात लवकर सुरू व्हावे. दोन आठवड्यांचा लॉकडाउन जास्त नाही आणि जर आपण दुसर्या देशात जात असाल तर कोणत्याही खेळाडूसाठी हे देखील महत्वाचे आहे आणि योग्यही आहे. लॉकडाऊननंतर काय होते ते पहावे लागेल." विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाआला टेस्ट सामन्यांच्या मालिकेसाठी वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर जायचे आहे. (IND vs AUS 2020: ऑस्ट्रेलिया दौर्यावर टीम इंडिया खेळू शकते 5 सामन्यांची टेस्ट मालिका, जाणून घ्या कारण)
या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नियोजित चारऐवजी पाच कसोटी सामने खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे. या दौऱ्यातून प्रशासकीय मंडळ कोरोनामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यास उत्सुक दिसत आहे. यावर धुमाळ म्हणाले की, "परंतु मर्यादित ओव्हर क्रिकेट खेळल्यास अधिक महसूल मिळेल." ते म्हणाले, “लॉकडाउनमुळे त्यांना महसुलात तोटा होणार, लॉकडाउननंतर त्यांना महसूल मिळवायचा असेल आणि बहुधाकसोटी सामन्यापेक्षा वनडे किंवा टी-20 मधून जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.’’
दरम्यान या दौऱ्याला अद्याप सहा महिने बाकी आहे आणि तोपर्यंत गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. बुंडेस्लिगा, ला लीगा आणि प्रीमियर लीगसारख्या अनेक फुटबॉल लीग पुढच्या महिन्यापर्यंत हंगाम पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहेत आणि क्रिकेट मालिका खेळण्यासाठी हे ब्ल्यू प्रिंट म्हणून वापरले जाऊ शकते. दुसरीकडे, टी-20 विश्वचषक विषयी धुमल म्हणाले की, थेट प्रशिक्षण न घेता थेट विश्वचषक स्पर्धा खेळणे योग्य होणार नाही. सर्व बोर्डांना टी -20 वर्ल्ड कपचा निर्णय घ्यावा लागेल.