SA Team (Photo Credit - X)

SA vs SL 2nd Test 2024: दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 109 धावांनी जिंकला. त्याच्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही बदल झाला आहे. या सामन्यासाठी डॅन पीटरसनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात त्याने एकूण 7 विकेट घेतल्या. श्रीलंकेने पहिल्या डावात 358 धावा केल्या. यादरम्यान रिक्लेटन आणि काइल व्हेरेने यांनी शतके झळकावली. रिक्लेटनने 11 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. तर व्हेरेनेने नाबाद 105 धावा केल्या. कर्णधार बावुमाने 78 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 317 धावा केल्या. यादरम्यान बावुमा आणि एडिन मार्कराम यांनी अर्धशतके झळकावली. बावुमाने 66 धावांची तर मार्करामने 55 धावांची खेळी खेळली.

श्रीलंकेने दुसऱ्या डावात टेकले गुडघे

श्रीलंकेनेही दक्षिण आफ्रिकेला चोख प्रत्युत्तर देत पहिल्या डावात 328 धावा केल्या. यावेळी पथुम निसांकाने 89 धावांची खेळी केली. त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. कामिंदू मेंडिसने 48 धावांची खेळी केली. मॅथ्यूजने 44 धावांचे योगदान दिले. पण संघ दुसऱ्या डावात 238 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान कर्णधार धनंजया डी सिल्वाने 50 धावा केल्या. कुसल मेंडिसने 46 धावांचे योगदान दिले. संघाला 109 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हे देखील वाचा: Australia Record Pink Ball Test: पिंक बाॅल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे काय आहे रहस्य? का होत नाही पराभव; वाचा स्वीस्तर

दक्षिण आफ्रिकेचा संघ WTC गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत आणि 6 जिंकले आहेत. तर 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 14 सामने खेळले असून 9 जिंकले आहेत. तर 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. भारताने 16 सामने खेळले असून 9 जिंकले आहेत. तर 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.