भारतीय महिला क्रिकेटने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. हाँगकाँगमध्ये बुधवारी झालेल्या महिला इमर्जिंग टीम एशिया कप (Emerging Teams Asia Cup) जिंकून टीम इंडियाने (Team India) इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी बांगलादेश संघाचा 31 धावांनी पराभव केला. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत-अ महिला संघाने बांगलादेशचा 31 धावांनी पराभव केला. विजेतेपदाच्या सामन्यात भारत-अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा केल्या, प्रत्युत्तरात बांगलादेश-अ संघाला 19.2 षटकांत केवळ 96 धावा करता आल्या. अशा प्रकारे भारताने हा सामना 31 धावांनी जिंकला.

महिला क्रिकेट संघाकडून प्रथम फलंदाजी करताना दिनेश वृंदाने सर्वाधिक 36 आणि कनिका आहुजाने नाबाद 30 धावा केल्या. या दोन फलंदाजांच्या जोरावर भारत-अ संघाला 127 धावांपर्यंत मजल मारता आली होती. (हे देखील वाचा: Virat Kohli Completed 12 years in Test Cricket: विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमध्ये 12 वर्षे पूर्ण, पोस्ट शेअर करत केली पदार्पणाची आठवण; जाणून घ्या कशी होती कामगिरी)

श्रेयंका पाटीलला मालिकावीर म्हणून आले गौरविण्यात 

टीम इंडियाच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. ऑफस्पिनर श्रेयंका पाटील आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मन्नत कश्यप यांनी शानदार गोलंदाजी केली. श्रेयंकाने 4 तर मन्नतने 3 बळी घेतले. श्रेयंका पाटीलला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याने या स्पर्धेत एकूण 9 विकेट घेतल्या.