
IND vs SA T20 Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 10 डिसेंबरपासून टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम (Aidan Markram) आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत, जाणून घेऊया, दोन्ही संघांमधील टी-20 मधील आकडेवारी कशी आहे? (हे देखील वाचा: IND vs SA Series 2023: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया खेळणार इतके सामने, तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार; येथे सामन्याची वेळ आणि पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)
असा आहे दोन्ही संघामधील विक्रम?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 13 सामने भारताने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 10 सामन्यांत विजय मिळवला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अधिक सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाचा वरचष्मा आहे.
भारतीय खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर भारताकडून चमकदार कामगिरी करत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही रिंकू सिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे वेळापत्रक
10 डिसेंबर - पहिला T20, डर्बन
12 डिसेंबर- दुसरा T20, गेकेबरहा
14 डिसेंबर- तिसरा T20, जोहान्सबर्ग