T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँडकडून धक्कादायक पराभव, भारताचा थेट उपांत्य फेरीत समावेश; पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवीत
South Africa vs Netherlands |

'राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं', असं म्हणतात. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड (South Africa vs Netherlands T20 World Cup) यांच्यात सामन्यादरम्यान अशी घटना T20 World Cup 2022 सामन्यात पाहायला मिळाली. क्रिकेट विश्वात दमदार संघ आणि एकेकाळचा विश्वविजेता समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा नवख्या नेदरलँड संघाने धक्कादायकरित्या पराभव केला आहे. पहिल्याच डावात नेदरलँड संघाने 20 षटकांमध्ये 4 गडी बाद 158 धवांची मजल मारली. त्यामुळे दुसऱ्या डावासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य होते. दक्षिण आफ्रिका डावाच्या अखेरीस प्रत्यक्षात 8 गडी बाद केवळ 145 धवाच करु शकला.

नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केल्याने T20 विश्वचषक स्पर्धेत मोठी खळबळ पाहायला मिळाली. दक्षिण अफ्रिकेच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशचा विजेता म्हणून बाहेर पडावे लागेल आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करेल.

ट्विट

ट्विट

ट्विट

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सने हरवल्यानंतर भारतीय संघ T20WC 2022 च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताला T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी पहिल्या दोनमध्ये स्थान मिळू शकते. तर, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या आशाही पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.