टी-20 क्रिकेट, जसे ते म्हणतात, सर्व चौकार आणि षटकारांचा खेळ आहे. प्रेक्षकांना प्रचंड मोठे फटके आणि मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असते आणि टी-20 क्रिकेट या निकषावर खरे उतरले आहे. याशिवाय, आतापर्यंत टी-20 क्रिकेटचा इतिहास पहिला तर एक खेळाडू असा आहे ज्याने आंतरराष्ट्रीयचं नाही तर लीग क्रिकेटमधेही वर्चस्व गाजवले आहे आणि तो म्हणजे वेस्ट इंडिजचा (West Indies) तडाखेबाज फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle). गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटच्या इतिहासात जवळपास मोठ्या विक्रमाची नोंद आहे. यापैकी सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत सर्वात वेगवान शतक. गेलने 2016 मध्ये मुंबईत झालेल्या सामन्यात इंग्लंड (England) विरुद्ध 48 चेंडूत सर्वात जलद शतक ठोकले होते. टी-20 वर्ल्ड कपचा रोमांच सुरु झाला आहे आणि क्रिस गेलचा (Chris Gayle) या स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. यंदाच्या स्पर्धे कोणते फलंदाज गेलचा विक्रम मोडू शकतात यांच्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (T20 World Cup 2021: ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या निशाण्यावर असणार हे रेकॉर्ड, पाकिस्तानविरुद्ध सुरु करणार मोहीम)
1. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलियाचा धाकड अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल सध्या जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 72 टी-20 सामन्यांमध्ये 31.79 च्या सरासरीने आणि 158.53 च्या स्ट्राईक रेटने 1780 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. मॅक्सवेलकडे सर्वात वेगवान शतक ठोकण्याची ताकदही आहे. याशिवाय तो आयपीएल 2021 मध्ये जोरदार फॉर्ममधून स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे तो गेलचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडण्याचा पहिला दावेदार आहे.
2. केएल राहुल (KL Rahul)
भारतीय युवा सलामीवीर केएल राहुल देखील कारकिर्दीच्या शानदार लयीत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने तिसऱ्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. राहुलने आतापर्यंत टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 142.19 च्या स्ट्राईक रेटने 1557 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे की आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक राहुलच्या नावावर आहे. अशा स्थितीत टी-20 विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाचा गेलचा विक्रम मोडण्याची क्षमता राहुलमध्ये आहे.
3. डेव्हन कॉनवे (Devon Conway)
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जन्मलेला, किवी धर्मांतरित कॉनवेचा खरोखरच एक अपवादात्मक टी-20 रेकॉर्ड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत फक्त 14 सामने खेळले आणि 473 धावा केल्या आहेत. यादरम्यानच्या त्याची सरासरी 59.12 आणि इकॉनॉमी रेट 151.11 इतका आहे. कॉनवेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून कमी काळ झाला असला तरी न्यूझीलंडसाठी खेळत त्याने आपली मोठी खेळी करण्याची क्षमता दाखवली आहे. अशा स्थितीत तो गेलचा विश्वविक्रम मोडण्याचा दावेदार बनू शकतो.
4. जोस बटलर (Jos Buttler)
इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरने गेल्या अनेक वर्षात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीले असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बटलर मधल्या फळीत एक विस्वासू फलंदाज आहे. बटलरची गणना जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये होती. आणि त्यामागे मोठे कारणही आहे. बटलरने अद्याप टी-20 मध्ये शतक झळकावले नाही, परंतु त्याच्याकडे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे. त्यामुळे बटलर देखील गेलचा विश्वविक्रम मोडू शकतो.
5. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan)
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने टी-20 विश्वचषक 2021 मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम तो करू शकतो. रिझवानने 43 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 48.41 च्या सरासरीने आणि 129.09 च्या स्ट्राईक रेटने 1065 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 8 अर्धशतके केली आहेत. त्याच्याकडे कोणत्याही गोलंदाजाला सहज खेळण्याची क्षमता आहे.