T20 World Cup 2021: टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या पहिल्या साखळी सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानशी सामना होण्याच्या काही दिवसापूर्वी विराट कोहलीची (Virat Kohli) टीम इंडिया इंग्लंड (England) विरुद्ध त्यांच्या पहिल्या सराव सामन्यासाठी मैदानात उतरेल. भारताने मार्च महिन्यापासून एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि या दोन सराव सामन्यांमुळे संघ व्यवस्थापनाला सुपर 12 मध्ये अंतिम प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्यासाठी मोठी मदत होईल. प्लेइंग इलेव्हनवर शिक्कामोर्तब करण्याव्यतिरिक्त व्यवस्थापन प्रत्येक खेळाडूला संधी देण्यासाठी आणि त्यांना आयसीसी स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी काही प्रयोग देखील करू शकते. दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या सराव सामन्यासाठी सज्ज असताना, टीम इंडिया करू शकतील असे 3 निवड प्रयोग खालीलप्रमाणे आहेत. (T20 World Cup 2021: भारत विरुद्ध इंग्लंड Warm-Up सामन्यात ‘या’ खेळाडूंची होणार अग्निपरीक्षा, फ्लॉप खेळीने PAK विरुद्ध होऊ शकतो पत्ता कट)
ओपनिंग जोडी
रोहित शर्मा सलामीला येण्याचे निश्चित असल्यामुळे, टीम इंडिया (Team India) कदाचित केएल राहुल (KL Rahul) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या दोघांनाही संधी देण्याचा विचार करेल. ईशानवर राहुलचा वरचष्मा असताना, कर्नाटक फलंदाजाला भारताच्या मागील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. आयपीएल 2021 मध्ये राहुल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी होता पण किशनलाही मुंबई इंडियन्सने सलामीची पाठवल्यावर त्याने धमाकेदार फलंदाजी केली. किशनने यूएई लेगमध्ये सलामीवीर म्हणून 2 सामन्यात 25 मध्ये 50 नाबाद आणि 32 मध्ये 84 धावा केल्या. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे राहुल किशनच्या वरचढ आहे पण 23 वर्षीय फलंदाजाच्या फॉर्मकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल.
हार्दिक पांड्याच्या जागेला धोका
व्यावहारिकदृष्ट्या, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 मध्ये तज्ञ फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि शार्दुल ठाकूरची उपस्थिती भारताला तो पर्याय देते. शार्दुल एक आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे आणि तो फलंदाजीने हातभार लावू शकतो, ज्यामुळे तो पार्ट-टाईम अष्टपैलू बनतो. त्याने अद्याप उच्च स्तरावर आपले फलंदाजी कौशल्य सिद्ध करणे बाकी आहे. पण नियमितपणे फलंदाजीची संधी दिल्यास तो पुढील अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो. जर पांड्या गोलंदाजीसाठी तंदुरुस्त नसेल, तर व्यवस्थापन शार्दुलला अष्टपैलूची जबाबदारी देण्यासाठी पाठिंबा देईल यात शंका नाही.
रविचंद्रन अश्विनचे कमबॅक
एकदा टी-20 मध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक विकेट घेणारा, आर अश्विन टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी व्हाईट-बॉल संघांमधून 4 वर्षे राहुल. व्यवस्थापनाला त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल आणि प्रशिक्षक अश्विनला आयपीएल दरम्यान अधिक काळ बेंचवर बसलेल्या राहुल चाहरच्या जागी पुढे आणू शकतात. अश्विन सराव सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीला साथ देताना दिसू शकतो.