T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध जिंकल्यास सेमीफायनल प्रवास सुकर होईल, पण परभूत झाल्यास अशी पार होणार भारताची नौका? संपूर्ण समीकरण जाणून घ्या
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

UAE मध्ये सुरु असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील टीम इंडिया (Team India) विजेतेपदाची दावेदार मानली जात होती, मात्र पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर आता चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की त्यांचा संघ या मेगा इव्हेंटच्या उपांत्य फेरीत कसा प्रवेश करेल. भारताला सुपर-12 टप्प्यातील गट-2 मध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड (New Zealand), अफगाणिस्तान, नबिबिया आणि स्कॉटलंड संघांचाही समावेश आहे. बाबर आजमचा पाकिस्तान संघ सध्या सलग तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ दोन सामन्यांत एका विजयासह स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि स्कॉटलंड आणि न्यूझीलंड अजून खाते उघडू शकलेले नाही. (IND vs NZ, T20 World Cup 2021: टीम इंडियाला ‘या’ किवी गोलंदाजापासून धोका, घातक गोलंदाजीने रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही ढकलले आहे बॅकफूटवर)

भारतीय संघ 31 ऑक्टोबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पुढील लीग स्टेज सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. उपांत्य फेरीतील जागेसाठी आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी विराट कोहली आणि कंपनी हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील असेल. पण भारताने हा सामना गमावला तर त्याला गटातील उर्वरित संघांच्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. तीन विजयांसह पाकिस्तान संघाने बाद फेरीत जवळपास मजल मारली आहे. भारत आणि न्यूझीलंड यापैकी एक संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघ पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना हरले आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांचा आपले उर्वरित चार सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग सुकर करण्याचा निर्धार असेल. अशा परिस्थितीत जो संघ चार सामने जिंकेल त्याला 8 गुण मिळतील आणि नेट रनरेट खूप कमी असला तरी त्याचा उपांत्य फेरी गाठण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

दरम्यान, जर न्यूझीलंडने भारताविरुद्ध सामना जिंकला आणि त्यांचे इतर सर्व सामने - अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध जिंकले तर ते पाकिस्तानसह बाद फेरीसाठी पात्र ठरतील. हीच समीकरणे भारतीय संघालाही लागू पडतात. कोहलीची टीम इंडिया किवींविरुद्ध हरली, तर अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा आणि त्यानंतर टीम इंडियाने उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने असे समीकरण देखील इथे लागू पडते. पण अशी कोणतीही स्थिती उद्भवू नये याच्या टीम इंडिया प्रयत्नात असेल.