31 ऑक्टोबरला भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) आमनेसामने येतील तेव्हा भारतीय फलंदाज त्याच धोका सामोरे जातील जो त्यांना पाकिस्तानविरुद्ध सामन्यात करावा लागला होता. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसमोर भारताच्या आघाडीच्या फळीने गुडघे टेकले होते. आणि न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टविरुद्ध (Trent Boult) देखी असेच काहीसे पाहायला मिळू शकते. यामागचे कारण म्हणजे त्याचा टीम इंडियाविरुद्ध (Team India) मागील ट्रॅक रेकॉर्ड आणि स्पर्धेतील शेवटच्या सामन्यातील भारतीय फलंदाजांची कामगिरी. बोल्टचा भारतीय फलंदाज विशेषतः रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विरोधात जबरदस्त आहे. भारत आणि न्यूझीलंड टी-20 विश्वचषक 2021 सुपर 12 च्या गट 2 चा सामना दोन्ही संघांसाठी आर-पारचा असणार आहे. (IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या ताफ्यात 3 मोठे बदल संभव, पहिल्याच सामन्यातून समोर आल्या कमजोर कडी)
‘हिटमॅन’ रोहित शर्मा, KL राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांची न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टविरुद्ध आणखी एक कसोटी होणार आहे. या आभासी उपांत्यपूर्व फेरीत भारताचे आघाडीचे फलंदाज बोल्ट विरोधात कसा खेळ करतात हे पाहणे रंजक ठरेल. बोल्ट आयपीएल 2021 च्या यूएई लेगमध्ये फॉर्मशी झुंजत असताना दिसला. मात्र या गोलंदाजाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला सावध राहावे लागणार आहे. बोल्टने अनेकदा भारतीय फलंदाजांना आपल्या स्विंगिंग यॉर्कर्ससह अडचणीत पाडले आहे. बोल्टने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-20) भारताविरुद्ध 35 सामन्यांमध्ये एकूण 71 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने उजव्या हाताच्या फलंदाजांच्या 51 विकेट घेतल्या आहेत.
इतकंच नाही तर रोहित, राहुल आणि विराट कोहलीविरुद्ध बोल्टचा विक्रम जबरदस्त आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 15 वेळा या तीनही फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. रोहित 8 वेळा बोल्टचा बळी ठरला आहे, तर कोहलीला 6 वेळा बोल्टने पॅव्हिलियनमध्ये पाठवले आहे. बोल्टच्या चेंडूवर राहुल एकदा माघारी परतला आहे. उल्लेखनीय आहे की रोहित आणि विराट डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांसमोर संघर्ष करत आहेत. रोहितला डावखुरा वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक 14 वेळा बाद केले आहे, तर सूर्यकुमार यादव (T20) आणि विराट कोहली प्रत्येकी 10 वेळा एकाच डावखुऱ्या गोलंदाजाला बळी पडले आहेत. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया फलंदाजांच्या खेळीवर सर्वांचे लक्ष लागून असेल.