इंग्लंडचा (England) वनडे विश्वचषक विजेता कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 सामन्यापूर्वी मोठा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मॉर्गन गेल्या काही काळापासून फॉर्मशी झुंज देत आहे. त्यामुळे संघाला टी-20 विश्वचषक जिंकण्यास मदत होत असेत तर तो संघातील आपले स्थान सोडण्यासाठी देखील सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंड कर्णधाराने आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) आयपीएल (IPL) फायनलपर्यंत नेले असले तरी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) 11.08 च्या सरासरीने फक्त 133 धावा केल्याने त्याचा फॉर्म पुढे चर्चेचा विषय ठरला आहे. मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने 2019 वनडे वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले आणि 2016 मध्ये मागील टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, पहिल्या सराव सामन्यात मॉर्गनला विश्रांती देण्यात आली आणि त्याच्या जागी जोस बटलरने (Jos Buttler) सोमवारी दुबईत भारताकडून झालेल्या सात विकेट्सने केलेल्या पराभवामध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले. (T20 World Cup 2021: भारताविरुद्ध पराभवानंतर इंग्लंडसाठी आणखी एक वाईट बातमी, ‘या’ तडाखेबाज अष्टपैलूवर पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याची नामुष्की)
“मी नेहमी म्हटलेले काहीतरी आहे, [वगळले जाणे] हा नेहमीच एक पर्याय असतो,” तो म्हणाला. “मी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाच्या मार्गात अडथळा आणणार नाही. साहजिकच, माझ्याकडे धावांची कमतरता आहे, माझी कॅप्टन्सी चांगली झाली आहे. पण हो हे उत्तर आहे.” तो पुढे म्हणाला, “मी नेहमीच दोघांचे विभाजन करण्यात आणि त्यांना दोन भिन्न आव्हाने म्हणून हाताळण्यात यशस्वी झालो आहे.” उल्लेखनीय आहे की वर्ल्ड कप 2019 पासून मॉर्गन धावा करण्यात अपयशी ठरला आहे. यावर्षी त्याचा त्रास खूप वाढला आहे. मॉर्गनने यंदा 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त 82 धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये केकेआरची धुरा हाती घेतल्यावर मॉर्गनने आयपीएल 14 मध्ये 11.08 च्या सरासरीने 133 धावा केल्या.
मॉर्गन पुढे म्हणाला, “मी माझ्या सर्वात वाईट फॉर्ममधून बाहेर पडलो नसतो तर मी इथे उभा राहिलो नसतो. मी जिथे जिथे टी-20 क्रिकेट खेळायला येतो, तिथे मला खूप जोखीम घ्यावी लागते.” दरम्यान, इंग्लंड शनिवार, 23 ऑक्टोबर रोजी दुबईत वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्याने आपल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची मोहीम सुरु करेल.