टीम इंडिया गुडघ्यावर बसली (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सहावा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) सामना खेळला जात आहे. तब्ब्ल दोन वर्षांनंतर दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने आले आहेत. क्रिकेट विश्वातील दोन्ही संघातील या चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) टॉस जिंकला आणि टीम इंडियाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतासाठी केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) सलामी जोडी मैदानात उतरली. दोघे सलामीवीर फलंदाज जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आले, त्यावेळी पहिला चेंडू टाकण्यापूर्वी टीम इंडियातील (Team India) खेळाडू गुडघ्यावर (Knee) बसले होते पण बाबर आजमच्या पाकिस्तानी संघाने तसे केले नाही आणि उभे राहून आपल्या हृदयावर हात ठेवला. दोन्ही देशाच्या क्रिकेट संघांनी हे वर्णद्वेष (Racism) विरोधात लढा देण्यासाठी केले होते. यासह त्यांनी वर्णद्वेष विरोधात एकजूट असल्याचा देखील संदेश दिला. (IND vs PAK, T20 World Cup 2021: बाबर आजम ठरला टॉसचा बॉस, पाकिस्तानचा टीम इंडियाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण)

आपला आवाज जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठ्या टप्प्यावर ऐकला जावा हे दोन्ही आशियाई संगहांनी सुनिश्चित करण्यासाठी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत अशी कृती केली. दुबईमध्ये सुपर 12 सामन्यात पहिला चेंडू टाकण्यापूर्वी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमशी या संबंधी संक्षिप्त चर्चा केल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी वर्णद्वेष विरोधात आपली भूमिका दर्शवली. उल्लेखनीय म्हणजे, भारताचा कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव सीमारेषे बाहेर गुडघ्यावर बसलेले दिसले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि दुबईच्या बहुप्रतिक्षित लढतीत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी देखील अनेक क्रीडा संघ अलिकडच्या काळात वर्णद्वेषाविरुद्ध मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी गुडघे टेकत आहेत.

तसेच यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यात इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिजच्या (West Indies) खेळाडूही दुबईत शनिवारी झालेल्या सुपर 12 च्या सलामीच्या सामन्यात गुडघ्यावर बसले होते. दुसरीकडे, भारताला पहिले फलंदाजीला बोलावल्यावर पाकिस्तानने दणकेबाज सुरुवात केली. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या विकेटसह टीम इंडियाला जोर्दारदार धक्का दिला. रोहित भोपळाही फोडू शकला नाही तर राहुल अवघे 3 रन करून पॅव्हिलियनमध्ये परतला.