Syed Mushtaq Ali Trophy 2021: सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत विश्वविक्रम; क्रिकेटपटू पुनीत बिष्ट याने 51 चेंडूत नाबाद ठोकल्या 146 धावा
Punit Bisht (Photo Credits: Twitter)

क्रिकेटपटू पुनीत बिष्ट (Puneet Bisht) याने विश्विविक्रम केला आहे. सैयद मुश्ताक अली ट्राफी टी20 टूर्नामेंट (Syed Mushtaq Ali Trophy 2021) सामन्यादरम्यान मिजोराम विरुद्धच्या (Meghalaya vs Mizoram) सामन्यात त्याने मेघालय संघाकडून तुफान खेळी केली. अवघ्या 51 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 17 षटकार ठोकत पुनीत बिष्ट यांने नाबाद तब्बल 146 धावा केल्या. पुनीत बिष्ट हे मेघालय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. 34 वर्षीय बिष्ट याच्या कामगिरीची नोंद आंतरराष्ट्रीय पातळवीरही घेण्यात आली. त्याच्या नावावर विश्वविक्रम नोंदविण्यात आला.

पुनीत बिष्ट (Puneet Bisht) याने टी-20 क्रिकेट मध्ये 4 क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊनही सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. या बाबतीतला विक्रम श्रीलंकेच्या दशुन शनाका (Dasun Shanaka) याच्या नावावर होता. परंतू, हा विक्रम भारताच्या पुनीत बिष्ट याने मोडला आहे. शनाका याने 2016 मध्ये सिंहली स्पोर्ट क्लबमध्ये खेळताना गाले विरुद्धच्या सामन्यात 4 क्रमांकावर मैदानात येत नाबाद131 धावांची खेळी केली. तर ऋषभ पंत याने टी-20 क्रिकेट मध्ये 4 क्रमांकावर येत 128 धावांची खेळी केली आहे. सन 2018 च्या आयपीएलमध्ये पंतने हैदराबाद विरुद्ध 4 क्रमांकावर मैदानात येत 128 धावा ठोकल्या होत्या.

दरम्यान, बिष्ट यांच्याकडून खेळण्यात आलेल्या नाबाद 146 धावांची खेळी टी 20 क्रिकेटमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून केली आहे. विकेटकिपरने केलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. पुनीत याने या बाबतीत केएल राहुल (KL Rahul) यालाही पाठीमागे टाकले आहे. राहुल याने सन 2020 मध्ये आयपीएल मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाकडून खेळताना नाबाद 131 धवांची खेळी केली होती. बिष्ट याने मिजोराम विरुद्ध जोरदार फलंदाजी करत 17 षटकार ठोकले. या षटकारांची बरोबरी क्रिस गेल (Chris Gayle) याच्यासोबत केली जात आहे. (हेही वाचा, क्रिकेट: मुंबईच्या पृथ्वी शॉचा विश्वविक्रम; पदार्पणातच झळकावले अर्धशतक)

टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्यात संयुक्तरित्या बिस्ट हे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गेल ने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात 17 षटकार ठोकलेहोते. तर बिष्ट याने टी-20 क्रिकेट सामन्यात भारतात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा बहुमान आपल्या नावे केलाआहे. या बाबतीत त्याने श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला आहे. अय्यर याने 2019 मध्ये सिक्कीम विरुद्ध 145 धावांची खेळी करताना 15 षटकार ठोकले होते.