सुरेश रैनाने केलेला रनआऊट (Photo Credit: Twitter)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: टीम इंडियाच्या (Team India) सर्वात चपळ क्षेत्ररक्षकांमध्ये गणला जाणारा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) संघातून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) खेळत आहे. रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्र सिंह धोनीबरोबर अचानक निवृत्तीची घोषणा केली, पण निवृत्तीनंतरही रैनाची चपळता कमी झालेली नाही. याचाच एक नमुना उत्तर प्रदेशच्या त्रिपुराविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. शनिवार, 16 जानेवारी रोजी त्रिपुराविरुद्ध सामन्यात रैनाने केलेले रनआऊट पाहून चाहत्यांनाही रैनाच्या जुन्या दिवसांची आठवण येईल. त्रिपुराविरुद्ध (Tripura) सामन्यात रैना गोलंदाजी करत असताना फलंदाजाने त्याच्या दिशेने चेंडू खेचला, रैनाने चपळता दाखवत बॉल पकडला आणि पायच्या खालून स्टंपवर मारला. रैनाच्या या अप्रतिम फील्डिंगमुळे नॉन स्ट्राइकरवर असलेला त्रिपुरा संघाचा कर्णधार मुरासिंह (Murasingh) वैयक्तिक 17 धावांवर रनआऊट होऊन माघारी परतला. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: श्रीसंतच्या स्लेजिंगला मुंबईकर यशस्वी जयस्वालने या अंदाजात दिलं सडेतोड प्रत्युत्तर, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल कमाल है!)

रैनाच्या या अचूक थ्रोने चाहत्यांना धोनीचीही आठवण करून दिली. कारकीर्दीत धोनीदेखील अशीच धावपळता दाखवत अशाचप्रकारे रनआऊट केले आहे. गोलंदाजी करताना रैनाने फलंदाजी करताना चार ओव्हरमध्ये एकूण 23 धावा दिल्या, तर फलंदाजीत 23 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी केली. रैनाच्या या दमदार कामगिरीमुळे यूपीच्या संघाने स्पर्धेतील पहिला सामना जिंकला. रैनाने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार खेचले. 600 दिवसांहून अधिक काळ मैदानापासून दूर राहिल्यानंतर रैनाने सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पहा रैनाचे धोनी स्टाईल रनआऊट:

सामन्याबद्दल बोलायचे तर पहिले फलंदाजी करताना त्रिपुराने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 122 धावा केल्या. मिलिंद कुमारने संघासाठी सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. मोहसीन खान आणि शानू सैनी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेश संघाने 13.1 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले. रैना 36 धावांवर नाबाद राहिला तर करण शर्माने केवळ 36 चेंडूत नाबाद 68 धावा फटकावल्या. पराभवाच्या हॅटट्रिकनंतर स्पर्धेत यूपीने पहिला विजय नोंदवला. ते सध्या एलिट अ ग्रुपच्या टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहेत.