Syed Mushtaq Ali Trophy 2021: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी (Syed Mushtaq Ali Trophy) मुंबईचा कर्णधार म्हणून पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या हंगामात मुंबईचा रणजी (Mumbai Ranji) कर्णधार असलेला यादव अलिकडच्या वर्षांत संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ ठरला आहे. कोरोना व्हायरसने प्रभावित झालेले घरगुती क्रिकेटला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) टी-20 स्पर्धेसाठी 20 सदस्यीय संघ जाहीर केला. भारताचा अंडर-19 वर्ल्ड कप स्टार यशस्वी जयस्वालला देखील संघात सामील करण्यात आले आहे. शिवाय, आयपीएलचे मुख्य खेळाडू आदित्य तरे, सरफराज खान, सिद्धेश लाड आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकरचा मुलगा अष्टपैलू अर्जुन (Arjun Tendulkar) 20 सदस्यीय संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरला आहे. यादवने सराव सामन्यात 47 चेंडूत 120 धावा केल्या आणि अर्जुनच्या एका ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या होत्या. (Abu Dhabi T10 League 2021: अबू धाबी येथे 'हे' तीन भारतीय खेळाडू टी-10 लीग, वाचा सविस्तर)
धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडेची वेगवान जोडी संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल ज्यामध्ये स्पिनर अथर्व अंकोलेकर आणि शम्स मुलानीचा समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपर आदित्य तरेची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनने म्हटले आहे की, निवड झालेल्या सर्व खेळाडूंची कोविड-19 ची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल जी पास केल्यावर ते 29 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होतील. 2 जानेवारी रोजी बायो-बबलमध्ये दक्ष होतील आणि प्रत्येक सदस्याची सहा दिवसांच्या क्वारंटाइन दरम्यान तीनदा टेस्ट केली जाईल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी देशांतर्गत हंगामांला सुरुवात होईल आणि घरगुती दिग्गज मुंबई आपले सर्व सामने मुंबईत खेळतील.
मुंबई संघ: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), आदित्य तरे (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकरित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिथड मांजरेकर डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अटर्डे, शम्स मुलानी, हार्दिक तामोर, आकाश पारकर आणि सुफियान शेख.