Syed Mushtaq Ali Trophy 2021: मोहम्मद अझहरुद्दीनचे तुफानी टी-20 शतक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत सेन्चुरी ठोकणारा कोण आहे केरळ फलंदाज, जाणून घ्या
केरळ फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन (Photo Credit: Twitter)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: केरळचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने (Mohammed Azharuddeen) देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत मुंबई संघाविरुद्ध (Mumbai Team) झालेल्या सामन्यात अविश्वसनीय खेळी केली. अझहरुद्दीनने 54 चेंडूत 137 धावांची नाबाद शतकी खेळी केली आणि संघाला विजयी रेष ओलांडून दिली. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या सामन्यात अझरुद्दीनने अवघ्या 37 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. 197 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 26 वर्षीय फलंदाजाच्या तुफानी खेळीच्या जोरावर केरळने (Kerala) स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. नाबाद शतकी खेळीत त्याने 11 षटकार ठोकले आणि भारतीय फलंदाजाद्वारे टी-20 क्रिकेटमधील संयुक्त तिसऱ्या वेगवान शतकाची नोंद केली. 2015 मध्ये अझरुद्दीनने केरळसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि तो देशांतर्गत सर्किटवर अनुभवी फलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे या मोहम्मद अझरुद्दीनचा भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी खास संबंध आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत विश्वविक्रम; क्रिकेटपटू पुनीत बिष्ट याने 51 चेंडूत नाबाद ठोकल्या 146 धावा)

अझरुद्दीनचा जन्म 1994 मध्ये झाला होता. त्यावेळी जेव्हा देशात अझरुद्दीनसाठी चाहत्यांमधील वेडेपणा शिखरावर होते. त्याच्या चाहत्यांमध्ये तरुण फलंदाजाचा मोठा भाऊ कमरुद्दीनचा समावेश होता. भारताच्या माजी कर्णधाराच्या चाहत्यांमध्ये युवा फलंदाजाचा मोठा भाऊ कमरुद्दीनचा समावेश होता. त्याने त्याच्या धाकट्या भावाला आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव दिले. लहानपणापासूनच त्याला ‘अझर इन मेकिंग’ म्हणून संबोधले जात होते. त्याने 22 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि सुमारे 25 धावांच्या सरासरीने 959 धावा केल्या आहेत. त्याने नोव्हेंबर 2015 मध्ये गोवा विरुद्ध प्रथम श्रेणी प्रवेश केला होता. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 21 टी-20 सामन्यामध्ये या तरूणाने 404 धावा केल्या आहेत ज्यामध्ये वानखेडे येथे त्याने 137 धावांची आश्चर्यकारक खेळीचा देखील समावेश आहे.

अंडर-19 आणि अंडर-23 सर्किटमध्ये चांगली कामगिरी केल्यावर अझरुद्दीनला केरळ संघात स्थान देण्यात आले. दरम्यान, या विजयासह केरळने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून एलिट ग्रुप ई पॉइंट्स टेबलच्या शीर्ष स्थान मिळवले आहे. शिवाय, दिल्लीविरुद्ध 76 धावांनी आणि केरळविरुद्ध पराभवानंतर मुंबई संघ ग्रुप ई तळाशी आहेत. हरियाणासह दिल्लीनेही दोन सामने जिंकले आहेत. यामुळे, ग्रुप ई संघांचे 8 गुण असून  तर अन्य तीन संघांना अद्याप सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये आपले खाते उघडलेले नाहीत.