
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचे क्वार्टर-फायनल सामने 26 जानेवारीपासून सुरू होतील तर अंतिम सामना 31 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. नॉक आउट राउंडमध्ये पहिले 4 क्वार्टर फाइनल सामने खेळले जातील, त्यानंतर सेमीफायनल आणि अखेरीस 31 जानेवारी रोजी स्पर्धेचा फायनल सामना खेळला जाईल. ग्रुप स्टेजमध्ये पास होऊन कर्नाटक (Karnataka), पंजाब (Punjab), तामिळनाडू (Tamil Nadu), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), हरियाणा (Haryana), बडोदा (Baroda), बिहार (Bihar) आणि राजस्थान (Rajasthan) संघांनी बाद फेरी गाठली आहेत. कर्नाटक आणि पंजाब यांच्यात 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सरदार पटेल स्टेडियमवर स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना खेळला जाईल. त्याच दिवशी दुसरा क्वार्टर फायनल सामना तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश संघ यांच्यात संध्याकाळी 7 पासून खेळला जाईल. क्वार्टर-फायनलचे सर्व सामने अहमदाबाद येथील नवीन सरदार पटेल स्टेडियमवर खेळले जाणार आहे. स्पर्धेत बिहार संघाने आश्चर्यकारक कामगिरी बजावली असून ग्रुप स्टेजमध्ये खेळलेले सर्व 5 सामन्यांत 5 सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. (Syed Mushtaq Ai Trophy 2021 स्पर्धेतून माघार घेणं दीपक हुड्डाला पडलं महागात, BCA ने देशांतर्गत हंगामासाठी केली निलंबनाची कारवाई)
बिहारव्यतिरिक्त तामिळनाडू, बडोदा, हरियाणाची टीम सर्व 5 सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. क्वार्टर-फायनल जिंकणाऱ्या संघांना सेमीफायनलमध्ये स्थान मिळणार आहे. सेमीफायनल आणि फायनल सामना मोटेरा येथे खेळला जाणार आहे. दरम्यान, स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूंची कोविड-19 टेस्ट घेण्यात आली ज्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. कोविड महामारीमुळे बीसीसीआयने प्रत्येक गटाला एक शहर वाटप केले आणि इंदूर, मुंबई, कोलकाता, बेंगलोर, चेन्नई आणि बडोदा येथे मोठ्या प्रमाणात बायो-बबल तयार करण्यात आले होते. दुसरीकडे, कर्नाटक क्रिकेट संघाने मागील दोन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा जिंकली आणि यंदा संघाने पाच ग्रुप सामन्यांपैलू चार विजयांसह 2021 क्वार्टर-फायनल गाठले. करुण नायरच्या नेतृत्वात संघ आपला क्वार्टर-फायनल सामना पंजाबविरुद्ध खेळेल ज्याला ग्रुप-स्टेजमध्ये त्यांनी नऊ विकेटने पराभूत केले होते.
पहा क्वार्टर फायनलचे वेळापत्रक
26 जानेवारी: कर्नाटक विरुद्ध पंजाब, पहिला क्वार्टर-फायनल, वेळ दुपारी 12
26 जानेवारी: तामिळनाडू विरुद्ध हिमाचल प्रदेश, दुसरा क्वार्टर-फायनल, वेळ संध्याकाळी 7
27 जानेवारी: हरियाणा विरुद्ध बडोदा, तिसरा क्वार्टर-फायनल, वेळ - दुपारी 12
27 जानेवारी: बिहार विरुद्ध राजस्थान, चौथा क्वार्टर-फायनल, वेळ - संध्याकाळी 7
29 जानेवारी: पहिला सेमीफायनल, वेळ - दुपारी 12
29 जानेवारी: दुसरा सेमीफायनल, वेळ - संध्याकाळी 7