सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) टी-20 स्पर्धेत मुंबईने (Mumbai) खराब कामगिरी सुरूच ठेवली. त्यांना रविवारी स्पर्धेतील सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी त्याच्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) पुडुचेरीविरुद्ध (Pondicherry) ए ग्रुप सामन्यात संघाला सहा विकेटने प्रभाव पत्करावा लागला. पुडुचेरीच्या 41 वर्षीय डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज संता मूर्तिच्या (Santha Moorthy) गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज असहाय्य दिसत होते. पहिले फलंदाजी करताना 19व्या ओव्हरमध्ये संपूर्ण मुंबई संघ 94 धावांवर ऑलआऊट झाला. मूर्तीने चार ओव्हरमध्ये 20 धावा देत पाच गडी बाद केले आणि पुडुचेरीने 19 ओव्हरमध्ये चार विकेट गमावून 95 धावा करत दुसरा विजय नोंदवला. पुडुचेरीने बीसीसीआय स्पर्धेत मुंबईविरुद्ध विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुडुचेरीच्या या विजयाचा नायक सांता मूर्ती होता, ज्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये टी-20 मध्ये पदार्पणानंतर आपल्या कारकीर्दीतील फक्त दुसरा सामना खेळला. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: मुंबईचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात, हरियाणाच्या 8 विकेटच्या विजयाने ओढवली सलग तिसऱ्या पराभवाची नामुष्की)
या दमदार कामगिरीदरम्यान शांतमूर्तीनेही एक नवीन विक्रम नोंदविला. टी-20 क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा तो सर्वात वृद्ध गोलंदाज ठरला. त्याने Kenute Tulloch याचा विक्रम मोडला ज्याने 2006 साली वयाच्या 41 वर्ष आणि सात दिवसांत सेंट लुसियाविरुध्द 21 धावा देऊन पाच गडी बाद केले होते. मूर्ती यांनी प्रथम श्रेणी सामना आणि लिस्ट-ए सामना देखील खेळला आहे. योगायोगाने, गेल्या वर्षी वयाच्या 40व्या वर्षी मूर्तीने नागालँडविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात प्रवेश केला तेव्हाही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील डावात पाच विकेट घेण्याच्या विक्रमाची नोंद केली होती. दरम्यान, या टी-20 स्पर्धेतील पुडुचेरीचा हा सलग दुसरा विजय ठरला. पुडुचेरीचा अजून एक लीग सामना दिल्लीविरुद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत पुडुचेरी संघ दिल्लीवर वर्चस्व राखले की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
दुसरीकडे, मुंबईसाठी शिवम दुबेने 28, आकाश पारकर नाबाद 20 धावा केल्या तर पुडुचेरीकडून मूर्तीला वगळता एक अरविंददराजने 20 धावांवर 2 गडी बाद केले. मुंबईने दिलेली माफक धावसंख्येचा प्रत्युत्तरात पुडुचेरीने एस कार्तिक 26 आणि शेल्डन जॅक्सन नाबाद 24 धावांच्या जोरावर 6 विकेटने सामना जिंकला. मुंबईसाठी शिवम दुबे 8 धावांवर 2 विकेट काढल्या.