Syed Mushtaq Ali Trophy 2019: पृथ्वी शॉ याच्या बॅटवर विराट कोहली याने लिहीला खास संदेश; पाहा Photo
पृथ्वी शॉ (Photo Credit: Getty/Twitter)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये मुंबई (Mumbai) आणि पुणे संघात झालेल्या सामन्यात मुंबईचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने 27 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली. शॉ पुन्हा भारतीय संघात आपले स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नाही. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंदीवरून पुनरागमन करणाऱ्या पृथ्वीने दमदार पुनरागमन केले. आठ महिन्यांच्या डोपिंग बंदीवरुन परत आलेल्या या युवा खेळाडूने घरगुती सर्किटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी कठीण स्पर्धेचा विचार केल्यास भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण होईल हे त्याला ठाऊक असेल. सय्यद मुश्ताक अली टी -20 सामन्यादरम्यान शॉच्या बॅटवर कोणाचा तरी ऑटोग्राफ दिसला आणि चाहते हा ऑटोग्राफ कोणाचा आहे हे शोधण्यात लागले. (Syed Mushtaq Ali Trophy 2019-20: रन आऊट झाल्यावर सह खेळाडूवर भडकला राहुल तेवतिया, मैदानावर अशाप्रकारे व्यक्त केला राग, पाहा Video)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर फोटो अपलोड केला आणि त्यांच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे: “पृथ्वी शॉच्या बॅटवर हा  कोणाचा ऑटोग्राफ आहे?” कॅमेऱ्यात कैद झालेला संदेश तो इतर कोणाचा नसून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा होता. कोहलीने पृथ्वीला पुनरागमनासाठी संदेश दिला असल्याचे दिसत आहे. या बॅटवर विराटने ऑटोग्राफ देत लिहिले की, "डियर पृथ्वी, गेमचा आनंद घ्या, शुभेच्छा.'

क्रिकेटमधील पुनरागमन पृथ्वीसाठी अविस्मरणीय ठरले. मुंबईसाठी खेळत पृथ्वीने 39 चेंडूत 63 धावा करत आपला हेतू स्पष्ट केला. यानंतर पृथ्वीने पुढे 24, 17 चेंडूत 30 धावा, 39 चेंडूत 64 धावा, 19 चेंडूत 30 धावा आणि शेवटच्या सामन्यात 27 चेंडूत 53 धावा केल्या. मुंबई संघ सेमीफायनलमध्ये स्थान मिळवू शकला नसला तरीही पृथ्वीने दाखवून दिले की त्याच्यात एक जबरदस्त खेळ करण्याची क्षमता आहे. पृथ्वीला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने चांगली सुरुवात केली आणि भविष्यातील उत्तम खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहायाला सुरुवात झाली. पण, यादरम्यान त्याच्याकडून एक छोटीशी चूक केली, यामुळे तो केवळ संघाबाहेर नाही तर त्याच्यावर क्रिकेटमधून 8 महिन्यांसाठी बंदीही घालण्यात आली.