कारण जोहर, बबिता फोगाट (Photo Credit: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक निधनाने संपूर्ण देश सध्या दुखी आणि शोकग्रस्त आहे. दरम्यान, नेपोटिझमविरोधात आवाज उठवत ज्येष्ठ कुस्तीपटू बबीता फोगाटने बॉलीवूड फिल्म निर्माता करण जोहरला टार्गेट केले. बबिताने एका ट्विटमध्ये लिहिले, "निवडक कुटुंबांच्या तावडीतून फिल्म इंडस्ट्रीला बाहेर काढण्याची वेळ आली आहे. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन नातलगतावाद करणार्‍यांचे चित्रपट पाहणे बंद केले पाहिजे, अन्यथा छोट्या शहरांतून गेलेल्या किती लोकांना जीव द्यावा लागेल हे माहित नाही." सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने चित्रपटसृष्टीविषयी एक मोठे विधान केले आणि बबिताने तिचे समर्थनकरत करण जोहरवर निशाणा साधला असून कंगना रनौतला शेरानी असे संबोधले. कंगना म्हणाली, सुशांतने मोठे सिनिमे केलेत पण त्याला एकही मोठा अवॉर्ड मिळाला नाही. इंडस्ट्रीमध्ये ,मूवी माफियांची मुळं फार खोलवर रुतली गेलेली आहे. सुशांत त्याचा बळी पडला." (MS Dhoni on Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर एमएस धोनीची पहिली प्रतिक्रिया, मॅनेजरने दिली माहिती)

कंगनाच्या विधानाचे समर्थन करत बबीताने ट्विट केले की, "करण जोहर कोण आहे ?? यामुळे चित्रपटसृष्टीत घाण पसरली आहे का? हे त्याच्या बापजाद्याची मालमत्ता आहे का? फिल्म इंडस्ट्री यास योग्य प्रतिसाद का देत नाही? त्यास उत्तर देणारी आमची एक शेरनी बहीण कंगना रनौत. या टोळीचे सर्व चित्रपट बॉयकॉट करा."

सुशांतच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त करत कंगनाने बॉलिवूडवर नाराजी व्यक्त केली. बॉलिवूडमध्ये बाहेरील लोकांच्या कामाचे कधीच कौतुक होत नाही, त्यांचा काही उपयोग होत नाही असे त्यांना समजवून देण्यात आले आहे, असा आरोप कंगनाने केला. सुशांतच्या आत्महत्येला भ्याड पाऊल म्हणून संबोधणाऱ्या सर्व लोकांवर कंगनाने टीका केली. सुशांतची आत्महत्येला ड्रग्स इत्यादी गोष्टींशी जोडलेले पाहिलेले सर्वांना कंगनाने सडेतोड उत्तर दिले. कंगनाच्या टीमने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कंगनाने फिल्म इंडस्ट्रीतील लोकांवर निशाणा साधत म्हटले की ही आत्महत्या नव्हे तर प्लॅन्ड मर्डर आहे.