टीम इंडियाला वेस्ट इंडिज (IND vs WI) दौऱ्यावर दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळल्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळावी लागणार आहे. जी उद्या म्हणजेच 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघ टी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. टीम इंडियाने एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही मालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. आता टीम इंडियाची नजर टी-20 मालिकेवर आहे. अशा परिस्थितीत या मालिकेत टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दोन्ही संघांचे विक्रम आहेत. सध्या टीम इंडिया आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हा ताज कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
पुन्हा एकदा बनणार नंबर 1 फलंदाज
सूर्यकुमार यादवला अजून एकदिवसीय फॉर्मेटमध्ये स्वत:ला सिद्ध करायचे आहे, पण टीम इंडियाच्या या अनुभवी फलंदाजाने टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. सूर्यकुमार यादवने या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी यापूर्वीच अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत आणि 2023 मध्येही तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. (हे देखील वाचा: Hardik Pandya New Record: हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध केला अनोखा विक्रम, कपिल देव आणि विराट कोहलीला टाकले मागे)
सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानावर
आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने 152.57 च्या स्ट्राइक रेटने 267 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकही त्याच्या बॅटमधून झळकले आहे. पण सूर्यकुमार यादवला नंबर 1 फलंदाज होण्यासाठी अजूनही 85 धावांची गरज आहे. सध्या, सूर्यकुमार यादव यंदाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे आणि त्याला या यादीत अव्वल स्थान गाठण्यासाठी फक्त 85 धावांची गरज आहे. यावर्षी न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनने 11 टी-20 सामन्यांमध्ये 148.94 च्या स्ट्राइक रेटने 353 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादवकडे संधी
यावर्षी ऑक्टोबरमध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे त्यामुळे बहुतेक संघ टी-20 खेळत नाहीत आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्याचबरोबर टीम इंडिया ऑगस्टमध्ये 8 टी-20 सामने खेळणार आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 13 ऑगस्टला संपेल.