IND vs NZ: सूर्य कुमारने केले मोठे वक्तव्य, म्हणाला- लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये करणार पदार्पण
Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) हिरो ठरला. या सामन्यात त्याने केवळ 51 चेंडूत 111 धावा केल्या. या सामन्यात सूर्याचा 360 डिग्रीचा खेळही पाहायला मिळाला. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शाॅट मारले. सूर्याची फलंदाजी पाहून मैदानातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. सूर्याला कसोटी संघातही संधी द्यायला हवी, असे अनेक दिवसांपासून चाहत्यांचे मत आहे. आता सूर्याने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सूर्यकुमार यादव आता कसोटी संघात स्थान मिळवण्याकडे लक्ष देत आहे आणि म्हणतो की त्याला लवकरच दीर्घ फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी कॉल मिळू शकतो.

मला माझी टेस्ट कॅप लवकरच मिळेल

जेव्हा सूर्यकुमारला कसोटी संघात स्थान मिळवण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, "ते येत आहे, ते (कसोटी निवड) देखील येत आहे." क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील जगातील नंबर वन फलंदाज सूर्यकुमारने प्रथम श्रेणीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मुंबईसाठी वर्षानुवर्षे क्रिकेट खेळला आहे. सूर्यकुमार म्हणाला, “मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा ते लाल चेंडूने होते आणि मी मुंबईत माझ्या संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होतो. मला कसोटी फॉर्मेटची चांगली जाण आहे आणि मला दीर्घ फॉरमॅट खेळण्याचाही आनंद आहे. मला आशा आहे की मला माझी टेस्ट कॅप लवकरच मिळेल.” (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd T20 2022: दीपक हुडाची हॅटट्रिक हुकली, तरीही 4 विकेट्स घेऊन विक्रम, न्यूझीलंडचा पराभव)

सूर्याला जुने दिवस आठवले

या सामन्यात सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानंतर त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. सूर्यकुमारचा खेळ पाहता दोन-तीन वर्षांपूर्वीच त्याचा राष्ट्रीय संघात समावेश व्हायला हवा होता, असे वाटते. या स्फोटक फलंदाजानेही भूतकाळात दुर्लक्ष केल्यामुळे निराश झाल्याची कबुली दिली. तो म्हणाला, “मी अनेकदा माझ्या भूतकाळाबद्दल बोलतो. जेव्हा मी माझ्या खोलीत असतो किंवा माझ्या पत्नीसोबत प्रवास करत असतो तेव्हा आपण दोन-तीन वर्षांपूर्वीच्या परिस्थितीबद्दल बोलतो. आजची परिस्थिती कशी आहे आणि तेव्हा आणि आता काय बदलले आहे याबद्दल आपण अनेकदा बोलत असतो.