रविवारी माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (IND vs NZ) एकतर्फी सामन्यात 65 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने शानदार खेळ दाखवला. या सामन्यात सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) चमकलाच पण दीपक हुडानेही (Deepak Hooda) आपले कौशल्य बॅटने नव्हे तर चेंडूने दाखवले आणि विक्रमही केले. या सामन्यात दीपकने जबरदस्त गोलंदाजी केली पण त्याची हॅटट्रिकही हुकली. 19व्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने सलग विकेट्स घेतल्या मात्र त्याला हॅट्ट्रिक करता आली नाही. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चार विकेट घेणारा दीपक पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाने हे काम केले नव्हते.
Brilliant spell by Deepak Hooda!🔥#crickettwitter #deepakhooda #INDvNZ pic.twitter.com/bLLuy8bvE9
— CricketGully (@thecricketgully) November 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)