David Warner: आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर याचे अनोखं अर्धशतक; 50 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा ठरला नववा खेळाडू
डेविड वॉर्नर (Photo Credit: IANS)

अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium)  दिल्ली कॅपिटलसचा सामना खेळताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) 50 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा नववा आयपीएल कर्णधार ठरला आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, ऍडम गिलक्रिस्ट, शेन वार्न, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडूलकर यांनी आयपीएलमध्ये 50 हून अधिक सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. या यादीत आता डेव्हीड वार्नर याचाही समावेश झाला आहे.

कर्णधार म्हणून वॉर्नरने 49 सामन्यात आतापर्यंत 26 विजय आणि 23 पराभव स्वीकारले आहेत. त्याने आयपीएल 2013 मध्ये पहिल्यांदाच हैदराबादच्या संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली हैदबादच्या संघाने आयपीएल 2016 च्या ट्रॉफीवर नाव कोरले होते. डेव्हिड वार्नर हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये 42.88 सरासरीने 4760 धावा केल्या आहेत. हे देखील वाचा- Abdul Samad Quick Facts: सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणारा जम्मू-काश्मीरचा तडाखेबाज फलंदाज अब्दुल समद बद्दल घ्या जाणून

दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामात सनरायजर्स हैदराबादने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद तिसरा सामना खेळत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाने दिल्लीसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात हैदबादचा संघ विजयाचे खाते उघडणार की नाही? हे सामना संपल्यानंतरच कळणार आहे.