ICC Test Rankings: स्टुअर्ट ब्रॉडची आयसीसी टेस्ट क्रमवारीत टॉप-5 मध्ये एंट्री, वेस्ट इंडिजविरुद्ध विक्रमी खेळीचा मिळाला फायदा; जसप्रीत बुमराहची घसरण
स्टुअर्ट ब्रॉड (Photo Credit: Getty)

यजमान इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) नुकत्याच संपुष्टात आलेल्या कसोटी मालिकेत यजमान टीमने दमदार खेळ करत मालिका 2-1 ने खिशात घातली. इंग्लंडने अखेरच्या निर्णायक सामन्यात 269 धावांनी विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या सामन्यातून वगळलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) विक्रमी कामगिरी करत टीमच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरीनंतर ब्रॉडने सात स्थानांची प्रगती केली असून आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या (ICC Test Rankings) क्रमवारीत तिसरे स्थान गाठले. ब्रॉडने सामन्याच्या अंतिम दिवशी 500 कसोटी विकेटचा कठीण टप्पा गाठला. ब्रॉडने अखेरच्या सामन्यात 67 धावांवर 10 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) आठव्या स्थानी घसरण झाली. आणखी एक इंग्लंडचा गोलंदाज क्रिस वोक्सला फायदा झाला. (ICC World Test Championship Points Table: इंग्लंडची तिसऱ्या स्थानी झेप; टीम इंडिया पहिले स्थान कायम तर ऑस्ट्रेलियाला धोका)

दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेत त्याने 20 व्या स्थानावर झेप घेतली आणि करिअरमधील सर्वोत्कृष्ट रेटिंग गुणांची नोंद केली आहे.  इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सलाही ताज्या अपग्रेडमध्ये फायदा झाला आणि त्याने पहिल्यांदा टॉप-20 मध्ये स्थान मिळवले. ओल्ड ट्रॅफर्डच्या सामन्यात 57 आणि 90 धावांसह 29 वर्षीय फलंदाज 17 व्या स्थानी पोहचला. वेस्ट इंडीजसाठी शाई होपने दोन स्थानी झेप घेतली आणि 68 व्या स्थानावर पोहोचला, तर वेगवान केमर रोचने इंग्लंडच्या पहिल्या डावात चार विकेट्स मिळवल्यानंतर 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 904 गुणांसह गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे तर किवीचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आयसीसीच्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत स्टीव्ह स्मिथने अव्वल तर विराट कोहलीबरोबर दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाचा सुरुवातीची सुरुवात मार्नस लाबूशेन तिसऱ्या स्थानावर आहे तर बेन स्टोक्स आता चौथ्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज आणि अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे. विंडीज कर्णधार जेसन होल्डर दुसरा सर्वोत्तम अष्टपैलू आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या डावात फलंदाजीने 45 चेंडूत 62 धावा केल्यानंतर ब्रॉडला सात स्थानाचा फायदा झाला आणि अष्टपैलूंमध्ये तीन स्थानांनी वाढ होऊन 11 व्या स्थानावर पोहचला आहे.