ICC World Test Championship Points Table: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा अखेरचा आणि निर्णायक सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर यजमान इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात खेळला गेला. मालिकेचा पहिला सामना साऊथॅम्प्टन येथे खेळविण्यात आला ज्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवाल. अशा परिस्थितीत ही मालिका रोचक असेल असे दिसत होते, पण इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत मालिकेतील शेवटचे दोन सामने जिंकले. मालिकेच्या अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने एकतर्फी विजय मिळवला. यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) गुणतालिकेत बदल पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजविरुद्ध पावसाने बाधित तिसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 269 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत इंग्लंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. (ENG vs WI 3rd Test: वेस्ट इंडिजविरुद्ध निर्णायक सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या विक्रमी कामगिरीने जुळला अनोखा योगायोग, इंग्लंडने नोंदवला दणदणीत विजय)
तथापि, यापूर्वी इंग्लंड दुसर्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर तिसर्या क्रमांकावर पोहोचला होता, पण आता इंग्लंड संघाने 226 गुणांसह तिसर्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या गुणतालिकेविषयी बोलताना भारतीय संघ (Indian Team) त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया (Australia) 296 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. पण, ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या स्थानाला इंग्लंडकडून धोका बनला आहे. विंडीजनंतर इंग्लंडला आता पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळायची आहे, अशा स्थितीत इंग्लंडने पाकविरुद्ध मालिका जिंकली तर ते दुसर्या स्थानावर पोहचू शकतात. पाकिस्तानविरुद्ध 3 साम्यांच्या कसोटी मालिकेला 5 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. मालिकेची पहिली कसोटी सामना मँचेस्टर येथे तर अंतिम 2 साऊथॅम्प्टन येथे खेळला जाईल.
After England's 2-1 series win against West Indies, here's how the World Test Championship table is looking 👇 pic.twitter.com/yzAVDgp6Ct
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 28, 2020
226 गुणांसह इंग्लंड तिसऱ्या, तर न्यूझीलंड 180 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दोघांमध्ये 46 गुणांचा फरक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 सायकलमध्ये भारताने सर्वाधिक 4 मालिका खेळल्या आहेत, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी 3 मालिका खेळल्या आहेत. दुसरीकडे, साऊथॅम्प्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजयासह खाते उघडल्यानंतर वेस्ट इंडीज 10 संघात 7 व्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमधील प्रत्येक मालिकेचे मूल्य 120 गुण आहे.