भारत-पाक क्रिकेट प्रस्तावावर कपिल देव यांनी पाकिस्तानला दिले सडेतोड उत्तर,- ‘पैशांची गरज असल्यास पहिले सीमेवर दहशतवाद थांबवा’
कपिल देव आणि शोएब अख्तर (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) कोरोन व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढाईत पैसे जमवण्यासाठी दिलेल्या मालिकेच्या प्रस्तावामुळे अख्तर आणि भारताचे वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) पुन्हा आमने-सामने आले. शोएबचा मालिका खेळण्याचा प्रस्ताव कपिल देव यांनी फेटाळून लावला. आता पुन्हा कपिल यांनी पुन्हा एकदा अख्तरला चोख प्रत्युत्तर दिले आहे. एका खासगी टीव्ही कार्यक्रमात कपिलने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला सूचना केली आहे की जर आपल्याला पैसे हवे असतील तर त्याने सीमेवरील दहशदवाद थांबवावा. शोएबने अलीकडेच कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी भारत-पाकिस्तानने रिकाम्या स्टेडियममध्ये सामना खेळला पाहिजे, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंनी तो फेटाळून लावला. (IND vs PAK क्रिकेट मालिकेवर BCCI ने सोडले मौन, भारत सरकारच्या अनुमतीशिवाय खेळण्यास दिला नकार)

कपिल, पुन्हा एकदा या विषयावर बोलताना म्हणाले की, "जर आपल्याकडे पैशांची कमतरता असेल तर सीमेवरील आपले कार्य (पाकिस्तानद्वारे पसरलेला दहशतवाद) थांबवावा आणि त्या पैशाने रूग्णालये आणि शाळांसह आणखी महत्त्वाची कामे केली जाऊ शकतात. जर आपल्याला खरोखर पैशांची गरज असेल तर आपल्याकडे बर्‍याच धार्मिक संस्था आहेत, त्यांनी पुढे आले पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. जेव्हा आम्ही धार्मिक स्थळांना भेट देतो तेव्हा आम्ही पुष्कळ ऑफर करतो, म्हणून त्यांनी सरकारला मदत करावी.” कपिलने भारत-पाकिस्तान मालिका खेळण्याची शक्यता नाकारली आणि कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पैसे गोळा करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत, असे त्यांचे मत आहे. "मी मोठे चित्र पहात आहे. क्रिकेट हा एकच मुद्दा आहे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याऐवजी ज्या मुलांना शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश घेता येत नाही त्यांच्याबद्दल मला काळजी वाटते कारण ती आमची तरुण पिढी आहे. त्यामुळे, प्रथम शाळा पुन्हा सुरू कराव्यात अशी माझी इच्छा आहे. क्रिकेट, फुटबॉल अखेरीस होईल," त्यांनी स्पोर्ट्स तकला सांगितले.

अख्तरने यापूर्वी भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रस्ताव दिला होता जेणेकरून प्रसारकांना पैसे मिळतील आणि यामुळे बर्‍याच लोकांना आपले जीवन जगण्यास मदत होईल. “मला वाटत नाही की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे ते कपिल भाईंना समजले. प्रत्येकजण आर्थिकदृष्ट्या अडकणार आहे. एकत्र येण्याची आणि कमाई करण्याची वेळ आली आहे. मी आर्थिक सुधारणांविषयी मोठ्या दृष्टीकोनातून बोलत आहे. जागतिक प्रेक्षकांना एकाच सामन्याने आकर्षित केले जाईल, यामुळे कमाई होईल. कपिल म्हणाला की त्याला पैशांची गरज नाही आणि त्याला नक्कीच नाही. पण इतरांना आहे. मला वाटते की हा प्रस्ताव लवकरच विचारात घेण्यात येईल,” अख्तरने आज तकला सांगितले.